Kanda Exporter : कांदा आणि शेतमालाचे निर्यातदार व्हायचंय? मग हे कराच…

Kanda Exporter

Kanda Exporter : कांद्यासह अनेकदा भाजीपाला आणि फळांचे दर पडतात. बऱ्याचदा हे भाव निर्यातीवरही अवलंबून असतात. शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना निर्यातदार होण्याची संधी आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आता केवळ स्थानिक बाजारापुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा मार्ग निवडावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (एमएसएएमबी) मदत करत आहे. भाजीपाला, फळे, प्रक्रिया केलेली उत्पादने यांची निर्यात करून अधिक नफा मिळवण्याची संधी शेतकऱ्यांना उपलब्ध आहे.

शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), उद्योजक हे सर्वजण ‘निर्यातदार’ म्हणून नोंदणी करू शकतात.

निर्यातदार होण्यासाठी करावयाच्या प्रमुख प्रक्रिया :

१. व्यवसायाची नोंदणी करावी
शेतकऱ्यांनी प्रथम आपली व्यवसाय संस्था तयार करावी. ती संस्था खाजगी, भागीदारी, कंपनी, सहकारी संस्था, ट्रस्ट किंवा शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) असू शकते. आयात-निर्यात नोंद क्रमांक (आयईसी) ही नोंद वैयक्तिक नावानेही घेता येते.

२. बँकेत चालू खाते उघडावे
राष्ट्रीयीकृत, सहकारी किंवा बहुराष्ट्रीय बँकेत परकीय चलन व्यवहारासाठी सुसज्ज चालू खाते असणे आवश्यक आहे. हे खाते तुमच्या संस्थेच्या नावावर असावे.

३. आयात-निर्यात नोंद क्रमांक (आयईसी) मिळवावा
या क्रमांकाशिवाय कोणतीही आयात किंवा निर्यात करता येत नाही. तो उद्योग व आंतरिक व्यापार महासंचालनालयाच्या संकेतस्थळावर (http://dgft.gov.in) जाऊन ऑनलाइन मिळवता येतो. यासाठी पणन मंडळाकडून १०००रु (जीएसटीसह) सेवा शुल्क आकारले जाते. अधिक माहितीसाठी export@msamb.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

४. एपीडा संस्थेमध्ये नोंदणी करावी
आयईसी मिळाल्यानंतर कृषि व प्रक्रिया अन्न निर्यात विकास प्राधिकरण (एपीडा) मध्ये नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र (आरसीएमसी) घ्यावे लागते. यासाठीही एमएसएएमबी मदत करते.

५. पणन मंडळात निर्यातदार नोंदणी
एकदा आयईसी मिळाल्यानंतर https://efc.msamb.com/CustomerReg या संकेतस्थळावर जाऊन एमएसएएमबीमध्ये निर्यातदार म्हणून नोंदणी करता येते.

संपर्कासाठी पत्ता
पुणे कार्यालय*
सी-ब्लॉक, इनकम टॅक्स भवन, स्वारगेट, पुणे
दूरध्वनी : ०२०–२४४४१५७७ / २४४४९५९८
ई-मेल : pune-dgft@nic.in

*नागपूर कार्यालय*
नवीन सचिवालय, व्हीसीए मैदानाजवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१
दूरध्वनी : ०७१२-२५४१२५६
ई-मेल : nagpur-dgft@nic.in

*मुंबई कार्यालय*
न्यू सी.जी.ओ. बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई – ४०००२०
दूरध्वनी : ०२२-२२०१६४२१
ई-मेल : mumbai-dgft@nic.in