Kisan Credit Card : शेतकऱ्यांना दिलासा; किसान क्रेडीट कार्डवर मिळणार ५ लाख कर्ज..

Kisan Credit Card : अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे किसान क्रेडीट कार्ड वरील कर्ज मर्यादा वाढविण्यात आली आहे. या आधी ही मर्यादा ३ लाख रुपये होती, ती आता ५ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना छोट्या बाबींसाठी आता पुरेसे भांडवल उपलब्ध होणार आहे.

सध्या किसान क्रेडीट कार्डवर ९ टक्के व्याजदर आहे. मात्र त्यात केंद्राकडून २ टक्के सवलत आणि जे शेतकरी मुदतीत कर्ज परत फेड करतील त्यांच्यासाठी आणखी ३ टक्के अशी एकूण ५ टक्के सवलत मिळते. याचा अर्थ शेतकऱ्यांना केवळ ४ टक्के व्याज देण्याची गरज असते. मार्च 2024 पर्यंत देशात 7.75 कोटी किसान क्रेडिट कार्ड खाती कार्यान्वित झाली आहेत. 31 मार्च 2024 पर्यंत मत्स्यव्यवसायासाठी 1.24 लाख आणि पशुसंवर्धनसाठी 44.40 लाख कार्डस् वितरीत करण्यात आली आहेत.

2023-2024 या आर्थिक वर्षात वितरित करण्यात आलेल्या कृषी कर्जांची एकूण रक्कम 25.48 लाख कोटी रु.वर पोहोचली. आर्थिक वर्ष 2024-25 साठी, भारत सरकारने कृषीसंबंधित क्रियाकलापांसाठी म्हणजे उदा. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मेंढी शेळी डुक्कर पालन, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन-इत्यादींसाठी 4.20 लाख कोटीच्या उप-लक्ष्यांसह 27.5 लाख कोटी रु.चे GLC लक्ष्य ठरविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *