Union-budget : आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत..

➡️ पीएम कृषी धनधान्य योजना: देशातील मागास १०० जिल्ह्यात राबवून १.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये उत्पादकता वाढवणे, विविध पिकांची लागवड, शाश्वत शेतीपद्धती, तालुका पातळीवर काढणी पश्चात सुविधा, सिंचन सुविधेत वाढ, दीर्घ व अल्प मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ➡️ किसान क्रेडिट कार्ड: शेतकऱ्यांना देण्यात येणारं कर्ज सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी किसान […]

Agricultural sector:शेती क्षेत्राच्या विकासाचा दर वाढला; आर्थिक पाहणी अहवालातील निष्कर्ष…

Agricultural sector

Agricultural sector:देशाच्या कृषी क्षेत्राच्या विकासाचा दर वाढला असून यंदाच्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तो २ वरून ३.५ पर्यंत पोहोचल्याचे आर्थिक सर्वेक्षण अहवालातून दिसून आले. पुढील आर्थिक वर्षात हा दर ३.८ टक्के राहू शकतो, असा अंदाज केंद्र सरकारने बांधला आहे. कृषी उत्पादकता आणि उत्पन्न सुधारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विशेषत: लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना तसेच समाजातील कमकुवत घटकांना […]

farmer success story: मराठवाड्यातले वसंतराव लाड पिकवतात ४० एकरवर करडई…

farmer success story:शाश्वत तेलबियांसाठी देशात तेलबियांचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. काही शेतकरी तेलबिया पिके घेऊन तेलबिया वाढीच्या मिशनला हातभार लावत आहेत. त्यापैकीच एक आहेत मराठवाड्यातले शेतकरी. मानवत (जिल्हा परभणी) येथील प्रगतशील शेतकरी वसंतराव लाड यांनी यंदा ४० एकर करडईचे पीक घेतले आहे. श्री. लाड हे प्रतिवर्षी अंदाजे ४० ते ५० एकर करडई पिकाची पेरणी करतात. […]

Kisan Credit Card : शेतकऱ्यांना दिलासा; किसान क्रेडीट कार्डवर मिळणार ५ लाख कर्ज..

Kisan Credit Card : अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे किसान क्रेडीट कार्ड वरील कर्ज मर्यादा वाढविण्यात आली आहे. या आधी ही मर्यादा ३ लाख रुपये होती, ती आता ५ लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना छोट्या बाबींसाठी आता पुरेसे भांडवल उपलब्ध होणार आहे. सध्या […]

Maharshtra weather update:फेब्रुवारीत थंडी असणार की पाऊस? जाणून घ्या हवामान..   

Maharshtra Weather Update:देशात ३० मे २०२४ ला आगमन झालेल्या नैरूक्त मान्सूनचे १५ ऑक्टोबर ला निर्गमन झाले. परंतु त्याच दिवसापासून ईशान्य मान्सूनच्या नावाने दक्षिण भारतातील ४ राज्यात स्थिरावून सोमवार दि.२७ जानेवारीला देशातून निघून गेला आहे.       दरम्यान गेल्या १० दिवसापासून किमान तापमानातील चढ उतारासहित,  दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा २३ जिल्ह्यात माफकच थंडी जाणवली, […]

Economic survey 2025 : शेतीसाठी सावकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण घटले..

economic survey 2025: शेतीसाठी कर्ज काढताना शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास व्हायचा तो सावकारी आणि खासगी कर्ज पुरवठादारांचा. मात्र शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या क्रेडिट योजना, त्याला मुद्रा लोनसारख्या योजना आणि व्याजदरावर सवलत यामुळे शेतीमध्ये बँका, पतसंस्था यांच्यासह संस्थागत कर्जाची किंवा वित्तपुरवठ्याची हिस्सेदारी वाढली आहे. तर गैर संस्थागत म्हणजेच सावकार, खासगी कर्जपुरवठादार यांच्यासारख्यांचे प्रमाण घटले आहे. कर्जाच्या बाबतीत शेतकरी […]

Soybean bajarbhav : सोयाबीन उत्पादकांना दिलासा; हमीभाव खरेदीला मुदतवाढ..

soybean bajarbhav: राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून ३१ जानेवारीनंतर सोयाबीनची खरेदी पुढे काही दिवस चालू रहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत […]

Budget 2025 : केंद्रीय बजेटच्या दिवशीच कांदा बाजारभाव घसरणीचा कल..

budget 2025 and kanda bajarbhav: शुक्रवारी राज्यातील प्रमुख बाजारात कांदयाचे बाजारभाव तुलनेने काहीसे घसरलेले दिसून आले. या आठवड्याच्या सुरूवातीला २४०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले कांदा बाजारभाव आठवडा संपत आलेला असल्याने घसरताना दिसले. त्यात प्रति क्विंटल किमान २०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. शनिवारीही हा ट्रेंड टिकून राहिल्याने एका बाजूला देशाचे आर्थिक बजेट मांडले जात असताना […]