सरकार देणार हार्वेस्टर मशीनवर ५०% सबसिडी , शेतकऱ्यांनो या योजनेचा असा घ्या लाभ.

सरकार देणार हार्वेस्टर मशीनवर ५०% सबसिडी , शेतकऱ्यांनो या योजनेचा असा घ्या लाभ.

देशातील शेतकरी बांधवांची शेतीची कामे सहज व सोपी होण्यासाठी यंत्रांची आवश्यकता असते. यंत्रांच्यामार्फत शेतीची कामे कोणत्याही अडचणी शिवाय पूर्ण होतात. परंतु लहान व गरीब शेतकऱ्यांना ही यंत्र घेणे शक्य नसते.काही शेतकरी ही यंत्र घेण्यासाठी बँकेद्वारे कर्ज घेतात. परंतु अनेक प्रकारची मोठी कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी सरकारकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

या योजनेत शेतकऱ्यांना हार्वेस्टर मशीन खरेदीच्या किमतीवर ५० टक्के अनुदान दिली जाते.  भात, गहू काढण्यासाठी शेतकरी बांधवांना हार्वेस्टर मशीनची आवश्यकता असते. हे मशीन भारतीय बाजारपेठेमध्ये खूप महाग आहे. त्याची किंमत सुमारे 10लाख ते 50 लाख पर्यंत आहे. शेतकऱ्यांच्या हे यंत्र खरेदी करणे क्षमतेच्या बाहेर असते . त्यामुळे सरकारने हे मशीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. हार्वेस्टर सबसिडी योजनेचा लाभ त्या त्या राज्याच्या सरकारवर अवलंबून असतो. या मशीन साठी अनुदानाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच सरकारकडून अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांसाठी 50 टक्के तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 30 ते 40 टक्के अनुदान दिले जाते.

योजनेसाठी पात्र

अठरा वर्षापेक्षा जास्त वय असणे गरजेचे.

मागील सात वर्षांपासून कोणत्याही शासकीय योजनेतून कृषी उपकरणे घेतलेली नसावीत.

आधार कार्ड बँक खाते शी जोडलेले असावे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड.

बँक खाते .

मोबाईल नंबर.

पासपोर्ट साईजचा फोटो

शेतीची कागदपत्रे .

जात प्रमाणपत्र इत्यादी.

हार्वेस्टर अनुदानासाठी अर्ज कसा करावा

हे यंत्र खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्रात जाऊन संपर्क साधावा लागेल. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या कृषी उपकरण याच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. जिथे तुम्हाला त्यांच्याशी संबंधित संपूर्ण माहिती तपशीलवार सांगितली जाईल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *