शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात 8 रुपयांची घसरण, पशुखाद्याच्या दर वाढले ,

शेतकऱ्यांना मोठा झटका! गायीच्या दूधदरात 8 रुपयांची घसरण, पशुखाद्याच्या दरात वाढ..

आपल्या देशात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. असे असताना आता हा दुधाचा व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. गाईच्या दुधाचे दर हे ४० रुपयांवरून आता ३२ रुपयांवर आले आहेत गाईच्या दुधाच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी आता अडचणीत सापडला आहे. पशुखाद्याच्या मात्र भरपूर किमती वाढल्या आहेत .

त्यामुळे आता सरकारने दुधाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत आता आणखीच आक्रमक झाले आहेत. दरम्यान, जर्सी दुभत्या गायींचे प्रमाण जास्त असून आता या शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणारा चारा संपला आहे.

अशातच पाऊसाने आगमनास उशीर केला आहे, पाऊस न आल्यामुळे खाद्य देखील संपले आहे. त्यामुळे पशुपालकांवर दुहेरी संकट आले आहे. यामुळे शेतकरी आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. दुधाचे दर मागील काही दिवसांपासून वाढले होते.

त्यामुळे दुग्ध व्यवसाय वाढवण्याच्या शेतकरी तयारीत होते, मात्र त्यांच्यावर संकट आहे.यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत .

७ ते १० टक्क्यांनी अलीकडच्या काळातदूध उत्पादन वाढले होते . दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थाची आयात केली जात होती त्यामुळे दुधाचे दर घसरले असतील असे सांगितले जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *