विदर्भातील बहुतांश बाजार समितीमध्ये नव्या तुरीची आवक होत असून सध्या दर काहीसे दबावत आहेत.किरकोळ बाजारात तूरडाळ महाग विकली जात असली तरी घाऊक बाजारात मात्र दर 8700 ते 9000 रुपयांवर स्थिरावल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले आहे.
जुन्या तुरीला 9300 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. अमरावती बाजार समितीत रोज सरासरी 550 क्विंटल ची आवक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मॉन्सूनोत्तर उत्तर पाऊस ,धुके त्याच्या परिणामी वाढलेला कीड रोग यामुळे यंदाच्या हंगामात तुरीची उत्पादकता प्रभावित झाल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर देखील बाजारात तुरीला 10000 रुपयांच्या खाली दर मिळत आहे . अमरावती बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारातील तुरीची रोजची आवक 550 ते 600 क्विंटल एवढी आहे.
यातील आठ हजार 700 ते 9000 रुपयांचा दर हा नव्या तुरीला मिळत आहे. दुसरीकडे जुन्या तुरीत ओलावा कमी असल्याचे कारण देत 9300 रुपयांचा दर व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे. नागपूरच्या कळमना बाजार समितीत अध्याप नव्या तुरीची अपेक्षित आवक होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीला ८७०० ते 9 हजार 700 असा दर तुरीला होता ,त्यानंतर ९५००, ९०११ असा दर तुरीला मिळाला. सध्या 9000 रुपयांनी तुरीचे व्यवहार होत आहेत. बाजारातील आवक जेमतेम चार क्विंटलवर स्थिरावली असून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बाजारात तुरीची 23 डिसेंबरला अवघी एक क्विंटल आवक झाली त्याला 6200 एवढा दर मिळाला.
या ठिकाणी सर्वाधिक 130 क्विंटल ची आवक नोंदविण्यात आली कारंजा बाजारात जुन्या तुरीचे दर ७०३५ ते ८९०५ प्रमाणे होते. 110 क्विंटल ची आवक झाली.शासनाचा हमीभाव सात हजार रुपयांचा असून त्यापेक्षा जास्तीचा दर मिळत असल्याचे समाधान असले तरी तुरीच्या दराने दहा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता . त्यामुळे त्याच दराने खरेदी व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दुसरीकडे व्यापारी मात्र नव्या तुरीत ओलावा अधिक असल्यामुळेच दर काही प्रमाणात दबावत असल्याचे सांगत आहेत.