कृषी बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या शेंगाला सर्वाधिक प्रतिक्विंटल 8350 रुपये असा विक्रमी भाव मिळाला. अशी माहिती बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे यांनी दिली ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेले चाळीसगाव बाजार समिती कांद्यासाठी ही प्रसिद्ध आहे.
तसेच दर शनिवारी भरणारा येथील गुरांचा बाजार देखील प्रसिद्ध आहे. सुमारे 200 कोटीची उलाढाल असलेल्या या बाजार समितीमध्ये बाजरी ज्वारी गहू मका हरभरा इत्यादी शेतमालांबरोबर शेंगा शेतमालाचा लिलाव देखील केला जातो. एकेकाळी शेंगा यासाठी येथील बाजार समिती प्रसिद्ध होती.
कालांतराने शेंगाची आवक कमी झाली होती ,व कांदा व कापूस याकडे शेतकऱ्यांचे कल वाढला होता. परंतु आता कांदा व कापूस या नगदी पिकांची ही हमी नसल्यामुळे शेतकरी बांधव शेंगा हे पीक सुद्धा घेतात.
बुधवारी बाजार समितीमध्ये शेंगा या शेतमालाला चालू हंगामातील विक्रमी प्रतिक्विंटल 8350 रुपये इतका भाव मिळाला. व शेतकरी राजा आनंदी झाल्याचे चित्र बघायला मिळाले शिंदी येथील शेतकरी महेंद्र सूर्यवंशी यांच्या शेंगांना आज हंगामातील विक्रमी भाव मिळाल्याने ते आनंदी झाल्याचे चित्र त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले.
तालुक्यातील शेतकरी बांधवांनी भुईमूग शेंगा शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीचा आणावा असे आव्हान बाजार समितीचे सभापती कपिल पाटील व उपसभापती साहेबराव राठोड व संचालक मंडळाने केले आहे.