मागेल त्याला शेततळे योजनेतील लॉटरी पद्धत आजपासून बंद करण्यात आलेली आहे . आज पासून जो कोणी अर्ज करणार त्या शेतकऱ्याला आता शेततळे मिळणार, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घोषणा करत सांगितले .
धनंजय मुंडे यांनी सांगितले की मागेल त्याला शेततळे याची व्याख्या लॉटरी सिस्टीम नाही, जे मागेल जे आपल्या पोर्टल वरती आले आहे, जेवढे ऑनलाइन आलेले आहेत. ते जवळजवळ तीन लाख ऑनलाईन ड्रीप चे आणि मागेल त्याला शेततळे याची तात्काळ क्लीअर करा.याला कसल्याही लॉटरी मधून जाण्याची गरज नाही . सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी ज्यांनी मागितले त्याला शेततळे आणि ज्यांनी मागितले त्याला ड्रीप दिले गेले पाहिजे हा आजच्या बैठकीमध्ये फार महत्वाचा निर्णय घेतलेला आहे.
कृषी विभाग तालुका निहाय रिपोर्ट देणार
काही ठिकाणी तीन ते चार दिवस अतिवृष्टी झाली आहे. तर काही ठिकाणी पाऊस कमी झाला आहे. 22 ते 30 जुलै पर्यंत सोयाबीन पेरण्या करता येतील. तसेच दुबार पेरणीची गरज पडल्यास कृषी विभाग रिपोर्ट तालुकानिहाय रिपोर्ट देणार आहे.
शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याचे आव्हान.
एक रुपयात पिक विमा योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं वन धनंजय मुंडे यांनी केले आहे.