अनेक जण नशीब आजमावत असतात त्यांना लॉटरी लागते त्यांचे नशीब उघडते पण या शेतकऱ्याच्या मेहनतीच्या आणि संधीच्या जोरावर दौलत खेचून आणली आहे सध्या टोमॅटोचे भाव आकाशाला भिडले आहेत दरवर्षी भाव नसल्यामुळे टोमॅटोला रस्त्यावर फेकून द्यायची वेळ यायची परंतु आता टोमॅटोला सोन्याचे दिवस आले आहेत
पुणे – नगर जिल्ह्यातील सीमेवर असलेला जुन्नर तालुका हा ग्रीन बेल्ट नावाने ओळखला जातो. या तालुक्यांमध्ये अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत मुबलक पाणी आणि कल्पकतेच्या जोरावर येथील शेतकरी अनेक नवीन नवीन प्रयोग करत असतात. सर्वाधिक पाणलोट आणि सिंचन याच तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे.
तसेच याच गावातील एका शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून 30 दिवसांमध्ये कोट्यावधी रुपये कमावले आहेत. या तालुक्यामध्ये सर्वाधिक कांदा व टोमॅटोचे उत्पादन घेतले जाते . सध्या टोमॅटो महागला यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला आहे.
टोमॅटो ने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे नशीबच पलटवले ठेवले आहे. या तालुक्यातील तुकाराम गायकर यांनी टोमॅटोच्या उत्पादनातून अवघ्या तीन महिन्यातच कोट्यावधी रुपये कमवले आहेत.
तुकाराम गायकर यांना 18 एकर बागायती शेती आहे. यामधील 12 एकर शेतीत मुलगा, पत्नी, सून यासह ते राबत असतात, गायकर यांच्या शेतीमध्ये 100 पेक्षा अधिक महिला काम करतात. मुलगा व सून शेतीची जबाबदारी सांभाळतात व आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते आदर्श शेतकरी झाले आहेत.
अशी लागली लॉटरी
एका महिन्यामध्ये त्यांनी 13000 टोमॅटो कॅरेट विक्रीसाठी पाठवले होते. त्यामधून एक पॉईंट पंचवीस कोटीहून अधिकची कमाई केली आहे. त्यांना 2100 रुपये असा भाव मिळाला. गायकर यांनी आत्तापर्यंत नऊशे टमाटर चे कॅरेट विक्री केली आहे. एका दिवसात त्यांनी 18 लाख रुपये कमवले गेल्या महिन्यात त्यांना ग्रेडच्या आधारावर प्रति कॅरेट 1 हजार ते 24 रुपये मिळाले होते.