जगामध्ये सर्वात महाग आंब्याची चर्चा होते. तेव्हा मिया जाकी प्रजातीचे नाव समोर येते . आता भारतातील शेतकरी सुद्धा मिया जाकी या आंब्याचे उत्पादन काढू लागले आहेत. हा आंबा टेस्ट व सुगंधासाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे या जातीच्या आंब्याचे भाव खूप जास्त असतात. तो जगात सर्वात महाग आंबा म्हणून ओळखला जातो एक किलो मिया जाती आंब्याची किंमत अडीच ते तीनशे लाख रुपये आहे झारखंड मध्य प्रदेश नंतर ओडिशातील शेतकऱ्यांनी मिया जाकी आंब्याचे उत्पादन घेतले आहे. हा आंबा स्वादिष्ट आणि गोडव्यासाठी ओळखला जातो.
जगात सर्वात महाग आंबा.
मध्यप्रदेश झारखंड पाठोपाठ ओडिशातही एका शेतकऱ्याने या आंब्याचे उत्पादन काढले, फळबाग लागवडीतील मियाजाकी आंबा सर्वात महाग असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. ओडिशातील हा मिया जाकी आंबा पाहण्यासाठी लोक दूरवरून येत आहेत. ओडिशातील कालाहांडी जिल्ह्यातील भोई येथे हा शेतकरी राहतो. त्यांनी आपल्या फळ लागवडीमध्ये या आंब्याची शेती केली आहे
अडीच ते तीन लाख रुपये किलो
मिया जाकी आंब्याचे उत्पादन करणारा शेतकरी म्हणतो हा आंबा स्वादिष्ट व गोड असतो. जागतिक बाजारामध्ये याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये किलो आहे. मी माझ्या फळबागेत बऱ्याच प्रकारचे आंबे उत्पादित करतो. पण मिया जाकी आंब्याचे उत्पादन करणे हे त्यांचे स्वप्न होते मिया जाकी च्या बियांसाठी त्यांनी फळ भाग विभागाशी संपर्क केला बी मिळाल्यानंतर त्यांनी मिया जाकी चे बी रोवले
श्रीमंत लोकच करतात खरेदी
जगातील सगळ्यात महाग आंब्याचे मूळ नाव हे जपानी भाषेत ताईयो नो तमागो आहे . जपानच्या मियाजाकी राज्यात या आंब्याची शेती केली जाते. जगातील श्रीमंत लोक हा आंबा खातात बाजारात या आंब्याची विक्री केली जात नाही. या आंब्याचा लिलाव होतो. मियाजाकी आंबारायपूर आणि सिलीगुडीमध्ये आयोजित मँगो फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित करण्यात आला. बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार, मियाजाकी आंबा इरवीन आंब्याची जात आहे. इरवीन आंब्याची शेती जगातील इतर भागातही केली जाते.