राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आज पाऊस नव्हता ,काही भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं तसेच हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली .कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर तुलनेत अधिक दिसतो. सकाळपासून ऊन सावल्यांचा खेळ ही पाहिला मिळाला तर हवामानशास्त्र विभागाने आजही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे .
तर आज नेमकं कोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे .त्यासोबतच यलो अलर्ट कोणत्या जिल्ह्याला देण्यात आला आहे .याची माहिती तुम्हाला या लेखातून मिळेल .तर मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर प्रदेशातील गोरखपूर, पटना, श्री निकेतन, या भागात आहे. बंगाल उपसागराच्या ईशान्य भागात कमी क्षेत्राची निर्मिती झाली. आहे हे कमी दाबाचे क्षेत्र पंचवीस किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तर वायव्य कडे सरकत आहे, या कमी दाब क्षेत्राचे बंगालच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात अतिदाब क्षेत्रात रूपांतर झाले.
राज्याच्या अनेक भागात आज पावसाचा जोर कमी होता, पावसाने राज्याच्या बहुतांश भागात विश्रांती घेतली होती .तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या ,कोकण आणि घाटमाथ्यावर मध्यम पाऊस पडला ,तर विदर्भ आणि मराठवाड्यातही काही मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या खानदेशातही काही ठिकाणी पावसाची रिमझिम झाली, पण जोरदार पाऊस नव्हता राज्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. तर बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि ऊन, सावल्यांचा खेळ सुरू होता .हवामान शास्त्र विभागाने आजही राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.
आज कोकणात रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील काही भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे .तर कोकणातील सिंधुदुर्ग ,रायगड ठाणे ,तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला विदर्भातही काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान शास्त्र विभागाने आज विदर्भातील यवतमाळ ,अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर बुलढाणा अकोला आणि वाशिम जिल्ह्यात ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे तसेच राज्याच्या इतर भागांमध्ये तुरळ ठिकाणी हलका पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.