एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर केव्ही वाय द्राक्ष पिकासाठी गारपीट अवकाळी पासून द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानाची योजना कृषी विभागाकडून राबवण्यात येत आहे.
यामध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 100 हेक्टर क्षेत्राचा हा प्रकल्प आहे. एकूण खर्चाच्या 50% इतके अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी आरकेव्हीवाय मधून सहा कोटी 14 लाख 4 हजार रुपये इतके अनुदान निधीस मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पुढील जिल्ह्यांचा समावेश आहे .नाशिक ,सांगली, पुणे ,सोलापूर, अहमदनगर ,जालना, सातारा, उस्मानाबाद,
या योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी प्रणालीवर करण्यात येत आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी नाशिक सांगली, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर ,सातारा, जालना ,या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीपीडी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/login/login यावर संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रे
सातबारा उतारा, द्राक्ष पिकाच्या नोंदी सह, आठ अ उतारा, आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुक च्या पहिल्या पानाचा फोटो ,जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती) शेतकऱ्यांसाठी विहित नमुन्यातील हमीपत्र, बंध पत्र ,चतु: सीमा नकाशा आदींची आवश्यकता आहे.