शेतीचे अचूक नुकसान सांगणारा ‘ई-पंचनामा’ यामुळे 10 ते 15 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार मदत ,नागपूर विभागात देशातील पहिलाच प्रयोग,

शेतीचे अचूक नुकसान सांगणारा 'ई-पंचनामा' यामुळे 10 ते 15 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार मदत ,नागपूर विभागात देशातील पहिलाच प्रयोग,

शेतीच्या नुकसानीचे वेगाने पंचनामे व्हावेत यासाठी नागपूर विभागामध्ये  ‘ई पंचनामा’ उपक्रमाची तयारी सुरू  आहे. जुलै मधील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रशासनाने पंचनामे सुरू करण्याचे काम सुरू केले आहे.  शेतकऱ्यांचे नुकसान मोजण्यासाठी आजवर केल्या जाणाऱ्या पारंपरिक पंचनामा प्रक्रियेपेक्षा जास्त अचूक आणि तीव्रतेने होणारी ही प्रक्रिया आहे, ती जीआयएस प्रणाली वर आधारित आहे. ई पंचनामा प्रणालीमुळे पंचनामे वेगाने होऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देणे शक्य होणार आहे. 

राजकीय हस्तक्षेप आणि कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे शेतकऱ्याचे नुकसान होत होते, परंतु आता या नवीन प्रक्रियेमुळे टाळाटाळ करता येणार नाही .नुकसान भरपाई चे पैसे शेतकऱ्यांना दहा ते पंधरा दिवसात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार.  नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी केले जाणारे पंचनामे नेहमी राजकीय हेवेदावे आणि आरोप प्रत्यारोपाचे केंद्रबिंदू ठरतात .

आता पंचनामे अचूक व्हावे त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळावी या उद्दिष्टानेच नागपूर विभागात प्रायोगिक तत्त्वावर ई- पंचनामा या उपक्रमाची तयारी सुरू आहे . जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  त्या संदर्भात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाने ई-पंचनामा करणे सुरू केले आहे.  याच दरम्यान प्रशासनाकडून सध्या नागपूर विभागात प्रायोगिक तत्वावर राबवली जाणारी ई-पंचनामा प्रक्रिया लवकरच संपूर्ण राज्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राबवली जाणार आहे.

पंचनामाची वैशिष्ट्ये

पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या पंचनाम्यापेक्षा ई- पंचनामा जास्त अचूक आहे. 

जीआयएस प्रणालीवर ई – पंचनामा आधारित.

ई पंचनामा करणाऱ्या कर्मचाऱ्याला प्रत्यक्ष ठिकाणावर जावे लागणार. 

कार्यालयामध्ये बसून पंचनामे करता येणार नाही. 

जेवढं नुकसान तेवढेच संरक्षण या तत्त्वावर ई पंचनामा आधारला असल्या कारणामुळे, गाव पातळीवरील राजकीय हस्तक्षेप होणार नाही. 

आता होणाऱ्या पंचनाम्याच्या तुलनेमध्ये कमी कालावधीतच म्हणजेच सात ते दहा दिवसात ई पंचनाम्याची शेतापासून ते थेट मंत्रालयापर्यंतची प्रक्रिया पूर्ण होईल.  शेतकऱ्यांना नुकसान भरपाई डीबीटी प्रणाली द्वारे मंत्रालयातून एका क्लिकवर त्यांच्या खात्यात उपलब्ध करून देता येईल . नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिदरी यांनी पंचनामा मोहिमेची संकल्पना मांडली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *