व्यापाऱ्यांनो! शेतकऱ्यांना शेतीमालाचे तातडीने पैसे दिले नाही तर आता होणार…..

व्यापाऱ्यांनो! शेतकऱ्यांना शेतीमालाचे तातडीने पैसे दिले नाही तर आता होणारjpg

कष्टाने पिकवलेला शेतीमाल शेतकरी बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेतात.  शेतमाल विक्रीनंतर देखील व्यापारी शेतमालाचा माल खरेदी करून देखील वेळेवर पैसे देत नाही.  किंवा त्यात तातडी दाखवत नाहीत.

त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते.  परंतु आता व्यापाऱ्यांना सदर प्रकार करता येणार नाही. तसे पाहायला गेले तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे ताबडतोब देणे व्यापाऱ्यांना बंधनकारकच आहे.   या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आदेश राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमिरे यांनी दिले आहेत.

पणन संचालकांनी दिले हे आदेश

शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल विकल्यानंतर त्यांना तातडीने पैसे द्यावे व व्यापाऱ्यांनी जर तसे केले नाही तर संबंधित व्यापाऱ्यांवर आता कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक कोतमीर यांनी दिली.  त्यामुळे आता व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे अगदी वेळेवर देणे गरजेचे आहे.  नाहीतर पणन संचालकांच्या माध्यमातून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

यामध्ये महत्त्वाचे असे आहे की व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे शेतमाल खरेदी केल्यानंतर मालाची वजन झाल्यानंतर भावाप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे लगेच देणे बंधनकारक असल्याचा आदेश पणन संचालकांकडून देण्यात आला आहे.  शेतकऱ्याचे शेतमाला बऱ्याचदा कमी भाव गेल्यामुळे आधीच फटका बसलेला असतो.  त्यातच पैसे वेळेवर जमी आले नाही.  तर शेतकऱ्यांना मनस्ताप देखील सहन करावा लागतो.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पणन संचालकांनी अशा व्यापाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.  यामध्ये आता जर माल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या हिशोब वहीची तपासणी केली जाईल.  व त्यामध्ये जर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली असेल, तर व्यापाऱ्यांची बँकेमध्ये जी काही डिपॉझिट असते त्यामधून पैसे देण्यात येणार आहेत.  किंवा दुसरी बाब म्हणजे ज्या बँकेने संबंधित व्यापाऱ्याची हमी दिलेली आहे, अशा बँकेकडून शेतकऱ्यांना पैसे देण्याची कायद्यात तरतूद केलेली आहे.

यामध्ये पणनसंचालकांचा जो काही आदेश आहे.  त्यानुसार बाजार समितीमध्ये शेतमालाचे लिलाव झाल्यास व्यापाऱ्यांचे खरेदी आणि विक्री सह विक्री दराची माहिती घेण्याची काम हे बाजार समितीचे असल्याचे देखील यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.  या माध्यमातून ज्या व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन केलेले नसेल तर त्यावर कारवाई करण्याचा उल्लेख देखील यामध्ये आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *