आज पासून लिलाव सुरू, कांदा पुन्हा चढणार काट्यावर..

आज पासून लिलाव सुरू कांदा पुन्हा चढणार काट्यावर

कांदा निर्यात शुल्कावरून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून पुकारलेला बेमुदत लिलाव बंदचा निर्णय अखेर मागे घेतला असून गुरुवारपासून म्हणजेच आजपासून लिलाव सुरू करण्याचे जाहीर केले आहे.

तर दुसरीकडे जोपर्यंत निर्यात शुल्क कमी होत नाहीत तोपर्यंत विरोध कायम राहणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली . गेल्या दोन दिवसापासून कांद्याच्या प्रश्नावर चांगलेच वातावरण तापले असून व्यापारी शेतकरी संघटना तसेच राजकीय पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत.  यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती.  या बैठकीमध्ये कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी भूमिका मांडली बैठकीमध्ये नाफेडचे अधिकारीही होते.

कुठे काय झाले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लिलाव बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुकातील काँग्रेसने निर्यात शुल्क वाढीचा निषेध केला.  आणि कांद्याच्या माळा गळ्यात घालून घोषणाबाजी केली.

गोरेगाव येथे हिंगोली स्वाभिमानी संघटनेने कांदे जाळून निषेध केला.  तुळजापूर जिल्हातील धाराशिव येथे कांदा निर्यात कर अध्यक्षांची होळी करण्यात आली.

व्यापाऱ्यांची भूमिका केंद्र मांडणार

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी कांदा व्यापाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्न बाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे हा प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन दिले आहे.  व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी दिल्याने आम्ही आंदोलन मागे घेत आहोत .

-खंडू देवरे अध्यक्ष कांदा व्यापारी असोसिएशन

कांद्याचे 40% निर्यात शुल्क जोपर्यंत रद्द करत नाही . तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील.

-नाना पटोले काँग्रेस प्रदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *