राज्यात बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे पोषक हवामान झाले आहे. राज्याच्या विविध भागात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून अंतर्गत ओडिसा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आला असून बिकानेर, मंडळा, गुणा,रायपुर, कलिंगापट्टनम ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे
पावसाला पोषक हवामान झाल्याने सहा तारखेला सकाळ पर्यंतच्या 24 तासात मराठवाडा विदर्भ तसेच कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कोकण मधील रत्नागिरी, रायगड ,सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील धुळे ,नंदुरबार, जळगाव, पुणे ,मध्य महाराष्ट्र मधील छत्रपती संभाजीनगर, जालना तर विदर्भा मधील अकोला, यवतमाळ, अमरावती नागपूर, वर्धा, जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
उद्या आणि परवा छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील लातूर ,बीड, उस्मानाबाद ,आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. उद्या मराठवाडा विदर्भ खानदेश कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे.
दरम्यान हवामान खात्याने खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक व नगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार सरी पडतील असा अंदाज आहे.
जोरदार पावसाचा येलो अलर्ट
रायगड, धुळे, जळगाव, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.अकोला, अमरावती, यवतमाळ,
विजांसह पावसाचा इशारा
नाशिक, नगर, बीड, धाराशिव, गोंदिया, गडचिरोली.वाशीम, भंडारा, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा,