राज्यामध्ये 8 व 9 सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. सध्या राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे .
तर काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस सुरू आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर मुंबई सह ठाण्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. दरम्यान आज व उद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
पिकांच्या उत्पादकतेत घट होणार.
दरम्यान पेरणी होऊन महिना होत आलेला आहे , तरी काही भागांमध्ये पिकांना पाणी मिळाले नाही. महिना झाला तरी पावसाचा खंड झाल्यामुळे कापूस पिकाच्या उत्पादकतेत 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक घट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
जळगाव जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकांना दिलासा.
महाराष्ट्र सध्या पावसाचे अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मूळ जागेवर आणि जमिनीपासून दीड किमी उंचीच्या जाडीत असलेला मान्सूनचा आस देशाच्या मध्यावर पूर्व पश्चिम दिशेत व जागेवर आहे.
त्यामुळे पावसाची शक्यता असल्याची माहिती पुढे यांनी दिली आहे . विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या एक महिन्यापासून पावसाने खंड दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचे पावसाचे आगमन झाल्याने कापूस आणि सोयाबीन पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाने भूगर्भात पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असल्याने मोठ्या प्रतीक्षेनंतर आलेला हा पाऊस शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे.
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस.
विश्रांतीनंतर पुन्हा मुंबई सह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सखल भागात पाहणार पाणी साचायला सुरुवात झाली आहे. तसेच ठाणे परिसरात देखील पावसाचा जोर वाढला आहे . यामुळे संथ गतीने वाहतूक सुरू आहे . तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यातील सकाळपासून जोरदार पाऊस आला सुरुवात झाली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.