आता फक्त गट नंबर टाका आणि जमिनीचा नकाशा पहा, मोबाइल वर वाचा सविस्तर माहिती…

आता फक्त गट नंबर टाका आणि जमिनीचा नकाशा पहा, मोबाइल वर वाचा सविस्तर माहिती

जमिनीच्या बाबतीत असलेल्या बऱ्याच बाबी आता ऑनलाईन करण्यात आलेल्या असून या यासंबंधी राज्याच्या महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे . तुम्ही अगदी सातबारा उतारापासून ते जमिनीची इतर महत्त्वाची कामे काही मिनिटांमध्येच मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन पद्धतीने करू शकता.  त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये हेलपाटे मारणे यामध्ये जाणारा वेळ व पैसा यापासून मुक्तता मिळालेली आहे.

तसेच आपण जमिनीचा विचार केला तर बरेचदा जमिनीच्या हद्दी ,बांध तसेच रस्ते इत्यादी वरून वाद उद्भवतात त्यामुळे याप्रसंगी जमिनीचा सातबारा तसेच उतारा जितका महत्त्वाचा असतो तितकाच जमिनीचा नकाशा देखील महत्त्वाचा असतो.  त्यामुळे तुम्हाला जमिनीचा नकाशा कुठे मिळेल किंवा कसा काढावा हे माहिती असणे गरजेचे आहे.

जमिनीचा नकाशा काढण्यासाठी आता तुम्हाला कुठल्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही . अगदी घरी बसून ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर जमिनीचा नकाशा काढू शकणार आहात.  त्यामुळे आपण या लेखांमध्ये जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढावा याबद्दलची माहिती घेणार आहोत. 

ऑनलाइन पद्धतीने जमिनीचा नकाशा कसा काढावा ? 

1. जमिनीचा नकाशा ऑनलाईन काढण्याकरता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगलवर जाऊन त्या ठिकाणी    https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp   असे सर्च करावे लागेल. वेब साईड ओपन होण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो .

2. त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होते. तुम्ही पेज ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला तीन रेषा दिसतील त्यावर क्लिक करा . 

3.या ओपन झालेल्या नवीन पेजच्या डाव्या बाजूला तुम्हाला लोकेशन हा एक कॉलम दिसेल.  या कॉलम मध्ये तुम्हाला तुमचे राज्य आहे व कॅटेगिरी यामध्ये रुलर आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील . जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला रुलर या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.  तसेच तुम्ही जर शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला अर्बन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4. त्यानंतर तुमचा जिल्हा तसेच तालुका आणि तुम्ही राहत असलेले गाव निवडायचे आहे.  आणि सगळ्यात शेवटी व्हिलेज मॅप यावर क्लिक करणे गरजेचे आहे.

5. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावांमध्ये आहे त्या गावचा संपूर्ण नकाशा तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होतो.

6. त्यानंतर होम या पर्याय समोरील जो काही आडवा बाण आहे त्यावर क्लिक केले की तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकता.

7. त्यानंतर डावीकडे असणाऱ्या अधिक(+) आणि वजा (- ) या बटनावर क्लिक केले की नकाशा मोठा किंवा लहान आकारात तुम्हाला पाहता येतो.

जमिनीचा नकाशा कसा काढावा? 

1. डावीकडच्या बाजूला तीन एकाखाली एक डाव्या रेषा तुम्हाला दिसतील त्यावर जर तुम्ही क्लिक केले की तुम्ही पहिल्या पेजवर जाऊ शकता व तिथे गेल्यावर या पेजवर तुम्हाला सर्च प्लॉट नंबर या नावाचा एक कॉलम त्या ठिकाणी दिसेल.

2. त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकणे गरजेचे आहे . गट क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या जमिनीचा गट नकाशा त्या ठिकाणी ओपन होतो.

3. त्यानंतर होम या पर्यायासमोरील जो काही आडवा बाण आहे त्यावर क्लिक करून आणि त्यानंतर वजाबाकीचे बटन दाबून तुम्ही संपूर्ण नकाशा पाहू शकता.

4. यानंतर डावीकडे प्लॉट इन्फो या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेत जमीन कोणाच्या नावावर आहे.  त्या शेतकऱ्याचे नाव व त्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल.

5. गट क्रमांक मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे.  त्याची सविस्तर माहिती तुम्हाला तिथे दिलेली आहे.

6. संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित पाहिल्यानंतर डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी मॅप रिपोर्ट या नावावर क्लिक केल्यावर की तुमच्या जमिनीचा प्लॉट रिपोर्ट तुमच्यासमोर ओपन होतो.  त्यानंतर उजवीकडे खाली दिशा असलेल्या पानावर क्लिक केले की तुम्ही तो नकाशा डाऊनलोड करू शकता.

7. त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेत जमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात व खालच्या भागात या गट नकाशात कोणत्या शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे.  याची सविस्तर माहिती दिलेली असते.  अशा पद्धतीने तुम्ही अगदी सहजरीत्या तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *