भारत UAE ला 75 हजार टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करणार; निर्यात बंदी असतानाही मोठा निर्णय

भारत UAE ला 75 हजार टन बिगर बासमती तांदूळ निर्यात करणार; निर्यात बंदी असतानाही मोठा निर्णय

संयुक्त अरब अमरावती (UAE)  व्यतिरिक्त इतर देश ज्यांना भारत सरकारने बंदी असतानाही एनसीईएलमार्फत बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिली आहे.  त्यात सिंगापूर, मॉरिशियस, भूतान, सेनेगल आणि इंडोनेशियाचाही समावेश आहे.

केंद्र सरकारने सोमवारी नॅशनल को-ऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेड मार्फत संयुक्त अरब अमरावतीमध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिली आहे.  75000 टन तांदूळ निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली असून परदेशी व्यापार महासंचालयाने एक अधिसूचना जारी केली आहे , आणि या संदर्भात माहिती जारी केली आहे.

तांदळाच्या निर्यातीवर बंदी आल्याने वाईट परिस्थिती.. 

पीडीआयच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने सध्या देशात बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे अनेक देशांमध्ये भारताच्या या निर्णयानंतर तांदळाच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

या निर्णयामुळे अनेक देशांमध्ये तर लोकांना बिगर बासमती तांदूळ मिळण्याचे कठीण झाले होते . त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय सह इतर परदेशी नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तसेच भारताच्या निर्णयानंतर तांदळाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.  दरम्यान बंदी असतानाही भारताने आपल्या मित्राच्या आणि शेजारी देशाच्या विनंतीनुसार त्यांची अन्नसुरक्षा मागणी पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.  आणि काही देशांना  बिगर बासमती तांदूळ निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.

UAE  व्यतिरिक्त या देशांनाही यापूर्वी भारताने दिलाय दिलासा.. 

NECL  75 हजार टन बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिल्याने तेथील तांदळाच्या किमती दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या यादीत मॉरिशियस, भूतान  आणि सिंगापूरचा ही समावेश.

भारत सरकारने UAE व्यतिरिक्त इतरही बंदी असतानाही एनसीएएलद्वारे  बिगर-बासमती मध्ये तांदूळ निर्यात करण्यास मान्यता दिलेल्या इतर देशांमध्ये शेजारील भूतानचा  देखील समावेश आहे . भूतान ला 79 हजार टन तांदूळ निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे . तर सिंगापूरला 50 हजार टन  आणि मॉरिशियसला 14000 टन  बिगरबासमती तांदूळ निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारताकडून बिगर बासमती निर्यातीवर बंदी का?

भारत सरकारने किरकोळ किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी 20 जुलै रोजी बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार आहे.  ज्याने 2022 – 23 मध्ये तांदळाच्या जागतिक निर्यातीत 40 टक्के योगदान दिले होते.

भारताची 2022-  23 मध्ये एकूण बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात 42 लाख डॉलर होती.तर गेल्या वर्षी ही निर्यात 26.2 लाख डॉलर इतकी होती.भारत मुख्यत्वे अमेरिका , इटली, स्पेन,  थायलंड, , आणि श्रीलंका या देशांना बिगर बासमती तांदूळ निर्यात करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *