मोदी सरकार दिवाळीला देणार बंपर गिफ्ट; पीएम किसान सन्मान योजनेत होणार हा मोठा बदल; ..

शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणे व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविण्यापासून ते बोनस देण्याच्या सर्व घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आधी दिवाळीमध्ये देशाच्या जनतेला बंपर गिफ्ट देण्याची मोदी सरकार तयारी करत आहे भाडेकरूंना घर खरेदी करण्यासाठी आवास निधी योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे.  त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणे व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्यापासून ते बोनस देण्याच्या सर्व घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची दुपारी बैठक झाली सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्यापासून शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता .   परंतु हे सर्व प्रस्ताव दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी तूर्त रोखण्यात आले आहेत . आजच्या बैठकीमध्ये तीन खजिनांच्या रॉयल्टी दराला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

निवडणुकीचा मुहूर्त

1) 12 नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे.  17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश व छत्तीसगड 25 नोव्हेंबर रोजी राजस्थान आणि 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये मतदान होणार आहे.निवडणुकीच्या तारखा व दिवाळीच्या तारखा पाहून देशातील जनतेला दिवाळीच्या मुहूर्तावर  बंपर गिफ्ट देण्याची तयारी सुरू आहे.

2) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या मध्ये तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या 42% वरून तो 45  टक्के होण्याचा अंदाज आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविणार

◼️ शेतकरी सन्मान निधीची रक्कम सहा हजारापासून वाढून 12000 करण्याची योजना आहे.

◼️ केंद्रीय कर्मचारी व पेन्शनर्ससाठी डीए, बोनस देण्याची घोषणा होणार आहे.

◼️ देशातील १० कोटींपेक्षा जास्त भाडेकरूंसाठी आवास निधी योजना सुरू केली जाणार आहे.

◼️ महिलांसाठीही आकर्षक योजना सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *