कांद्याला ,काबुली हरभऱ्याला मिळतोय इतका भाव ? वाचा सविस्तर ..

1. केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातशुल्क लावल्यामुळे मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या मुद्द्यावरून राज्यात जोरदार खंडाजंगी सुरू होती.  दरम्यान सणासुदीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे कांद्याला दर मिळण्याची शक्यता आहे कांद्याचे भाव पुन्हा एकदा वर चढू लागले आहेत महाराष्ट्रातील लालसगाव बाजारामध्ये  कांद्याचे दर एकाच आठवड्यात३७ टक्के वाढले असून प्रतीनुसार किंमत 35 ते 60 रुपये किलो असा दर झाला आहे.

कांद्याचे भाव 23 रुपये किलो वरून 32 रुपये किलोवर गेले असून राज्यांमध्ये झालेल्या कमी पाऊस आणि कांदा काढण्याचे वेळी झालेल्या अवकाळी पाऊस असल्यामुळे यंदा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला आहे.  त्यामुळे उत्पादन कमी झाले असून आवक वाढली आहे.  तसेच मागच्या काही दिवसांत  कांद्याचे दर वाढले असता केंद्राने  बंपर स्टॉक कांदाही बाहेर काढला होता.  जिथे सरकार घाऊक बाजारात कांदा विकत आहे तिथे कांद्याचे दर तुलनेत कमी प्रमाणात म्हणजेच सात ते दहा टक्के वाढले आहे. यंदा खरिपातील लाल कांद्याचे पीक एक महिना उशिराने बाजारात येणार आहे. त्यामुळे भाव वाढ होत आहे.

दरम्यान 2022 23 च्या सरकारी अंदाजानुसार यंदा गहू व डाळींच्या उत्पादनातही कपात होणार आहे . गव्हाचे उत्पादन 22 लाख टनांनी घटवून 11.05 कोटी टन राहण्याची शक्यता आहे.  डाळींचे उत्पादन 15 लाख 2.6 कोटी टन राहण्याची शक्यता आहे.   तांदूळ मोहरी आणि मका यांची मात्र विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे.

लालसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याच्या भावात चांगली सुधारणा होऊन प्रतिक्विंटल कमीतकमी  3000 रुपये जास्तीत जास्त ४ हजार ५५१ रुपये  तर सरासरी चार हजार दोनशे रुपये इतका भाव मिळाला आहे. सध्या कांद्याची आवक कमी होत असल्याने भाव टिकून आहे.  दोन महिन्यांपूर्वी  कांद्याला कवडीमोल भाव मिळाला होता.  त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा फेकून देण्याची वेळ आली होती.

2. सोयाबीनचे भाव मध्ये सलग तिसऱ्या दिवशी नरमाई  दिसून आली.  आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे वायदे १२.४३ वर पोहोचले होते . तर सोयाबीन पेंट आज 417 वर होती.  देशातील बाजार समितीमध्ये भावपातळी ४४०० ते ४५०० रुपयांचे दरम्यान होते.  बाजारात सोयाबीन आवक वाढत आहे.  सोयाबीनचे भाव आणखीन काही दिवस या पातळीवर राहू शकतात असा अंदाज जाणकरांचा आहे.

3. कापसाचे वायद्यांमध्ये आज काहिशी सुधारणा झाली होती . आज दुपारपर्यंत शंभर रुपयांनी वाढवून 58 हजार दोनशे रुपयांवर पोहोचले होते . मात्र तुम्ही त्यांमधील भावपातळी मात्र सहा हजार तीनशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान होते . कापसाची भावपातळी आणखीन काही दिवस कायम दिसू शकते.

4. आल्याचे भावातील तेजी  मागील काही दिवसापासून थांबलेली आहे.  आल्याची खरेदी काहीशी मंदावली आहे.  सध्या प्रति क्विंटल सरासरी  दहा हजार ते 11 हजार रुपये दरम्यान आहे.  आल्याची तिची पुढील काळातही टिकून राहील .

5. काबुली हरभऱ्याला मागील काही दिवसापासून मागणी वाढलेली दिसत आहे.  त्यामुळे काबुली  हरभऱ्याच्या भावात काहिशी  सुधारणा दिसून आली आहे.  मागील तीन महिन्याच्या आढावा घेता ,लक्षात येत की भावात सतत चढ उतार दिसले होते,  मागील एका महिन्यापासून काबुली हरभऱ्याचे भाव ९ हजार ते १० हजारांच्या दरम्यान स्थिरावले होते.  मात्र मागणी वाढल्यामुळे काबुली हरभऱ्याच्या भावात पुन्हा वाढ झाली.  देशातील काबुली हरभऱ्याची उत्पादन घटले होते.  काबुली हरभऱ्याला पाऊस , बदलते वातावरणाचा मोठा फटका बसला होता.  त्यामुळे उत्पादन कमी झाले.

तर त्या हंगामात कापून हरभऱ्याचे उत्पादन ४ लाख टनांच्या आतच स्थिरावले. .  त्यामुळे बाजारातली आवक दिवसेंदिवस  कमी होत गेली  आणि महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात काबुली हरभरा आवक कमी होत आहे. जागतिक बाजारातही  काबुली हरभरा आता भाव खाताना दिसतो. भाव वाढलेले असतात दहा हजार ते बारा हजार रुपयांचा भाव मिळत आहे.  कमाल भाव  14000 वर पोहोचला आहे . काबुली हरभऱ्याचे भाव पाहून यंदा रब्बी  हंगामात लागवड वाढीची शक्यता आहे.  काबुली हरभऱ्याचे भाव मात्र आणखी काही महिने तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

Leave a Reply