केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मधील कार्यक्रमात या हप्त्याचे वितरण करण्यात आले परंतु अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सन्मान निधीचा 15वा हप्ता जमा झालेला नाही. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा पंधरावा हफ्ता जमा झाला नाही त्यांनी नेमके काय करावे याबद्दलची माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया.
ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता जमा झालेला नसेल त्यांनी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याची स्थिती तपासली पाहिजे. त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग झाले की नाहीत हे तपासावे तुम्ही तुमच्या बँकेची वेबसाईट आणि मोबाईल ॲप वापरू शकता . याशिवाय शेतकरी बांधवांनी त्यांच्या जवळच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा . तसेच शेतकरी बांधव पी एम किसान हेल्पलाइन क्रमांक 155261 वर संपर्क साधू शकता. तुम्ही पीएम किसान अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन तक्रार देखील करू शकता.
पैसे न येण्याचे अनेक कारणे.
तुमच्या खात्यात पैसे न येण्याची अनेक कारणे असू शकतात. एक कारण म्हणजे तुमची बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले नसेल . ई-केवायसी नसल्याची ही शक्यता आहे. याशिवाय असेही होऊ शकते की आपण अजिबात अर्ज केला नाही. जर तुम्हीही सर्व आवश्यक कामे पूर्ण केली असतील तर तुमची तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला लवकरच पैसे मिळतील.
अशाप्रकारे तक्रार दाखल करू शकता..
◼️ सर्वात अगोदर तुम्हाला पीएम किसान वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावे लागेल.
◼️ आता “रजिस्टर कंप्लेंट” या पर्यायावर क्लिक करावे.
◼️ यानंतर तुमची तक्रार लिहा.
◼️ तुमच्या तक्रारी सोबत तुमच्या कागदपत्रांची प्रतिजोडा.
◼️ तुमच्या तक्रार नंतर तुमचे नाव पत्ता बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर त्यामध्ये समावेश करा.
◼️ त्यानंतर शेतकरी बांधवांनी सबमिट बटनावर क्लिक करावे.
नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान निधी योजनेचा पंधरावा हप्ता जारी केला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता जारी केला. पंतप्रधान मोदी यांनी ‘आदिवासी गौरव दिना’च्या निमित्ताने झारखंडमधील बिरसा कॉलेज, खुंटी येथून योजनेचा 15 वा हप्ता जारी केला. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये हस्तांतरित केले आहेत.












