उन्हाळ कांद्यावर लाल कांदा भारी; नामपूरला सर्वाधिक 4150 चा भाव..

बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात मंगळवारी एक हजार वाहनांमधून सुमारे  १ हजार  ५०० क्विंटल उन्हाळ, लाल कांद्याची विक्रमी आवक झाली.   उन्हाळ कांद्यापेक्षा लाल कांद्याला जास्त भाव मिळाला.

उन्हाळ कांद्याला तीन हजार तीनशे ते तीन हजार 695 रुपये प्रति क्विंटल असा सर्वोच्च दर मिळाला आहे . तर सरासरी भाव हा तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा होता, तसेच लाल कांद्याला 4150 सर्वोच्च तर 3600 रुपये सरासरी भाव मिळाल्याची  माहिती बाजार समितीच्या सभापती मनीषा पगार व युवराज पवार सचिन संतोष गायकवाड यांनी माहिती दिली.

दिवाळीच्या पंधरा दिवसांच्या विश्रांती नंतर कांदा मार्केट सुरू झाल्याने सोमवारपासून मोठ्या प्रमाणात आवक आली होती.  उन्हाळ कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून आगामी काळात कांद्याचे दर स्थिर राहतील ,असा अंदाज आहे. 

यंदा मोसम खोऱ्यासह बागलाण तालुक्यात यंदा  लाल कांद्याची आवक उशिराने होत आहे . आगामी काळात मुबलक प्रमाणात नवीन कांदा बाजारात येईपर्यंत कांद्याचे दर टिकून राहतील . अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे . दीपावली पूर्वी कांद्याचे दर पाच हजार रुपये प्रति क्विंटपर्यंत पोहोचले होते . केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप केल्यानंतर कांद्याचे निर्यात मूल्य आठशे डॉलर केल्याने कांद्याचे सरासरी दर तीन हजार रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

कांद्याने भरलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे रस्ता लगतची वाहतूक विस्कळीत झाली होती.  परिसरातून येथील बाजार समितीत करंजाड उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे.  शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस  आणावा.  लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याकडून रोख  पेमेंट घ्यावे.  शेतकऱ्यांनी वाहन पार्किंग करताना बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सचिव संतोष गायकवाड अरुण अहिरे यांनी केले आहे.

नामपूरचे बाजारभाव, वाहनसंख्या.. 

– ३३००/३६९५₹ : १९९

– ३०००/३३००₹ : १९६

– २५००/३०००₹ : ११८

Leave a Reply