![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/01/तांदूळ-निर्यातीत-भारत-पहिल्या-स्थानावर-23-मेट्रिक-टन-तांदळाची-निर्यात.webp)
देशभरात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते यंदा पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे तांदळाचे उत्पादन घटले आहे. परिणामी केंद्र सरकारने यंदा जुलै महिन्यात बिगर बासमती तांदूळ निर्यातीवर बंदी घातली . त्यामुळे भारतीय तांदळावर निर्भर असलेल्या देशाची मात्र चिंता वाढली आहे . केंद्र सरकारने तांदळावर निर्यात बंद केल्याने अनेक देशांमध्ये तांदळाचे तुटवडा भासत असल्याने किमती देखील वाढल्याचे चित्र आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरिपातील अनेक पिकांवर त्याचा परिणाम दिसून आला . भात पिकावर देखील मोठा परिणाम झाला. इतर वर्षाच्या तुलनेत भारताचे उत्पादन कमी झाले असून,त्यातच तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने जुलै 2023 मध्ये बिगर बासमती तांदळावर निर्यात बंदी आणली . वाढत्या दराने अनेक देशांसमोर अडचणी निर्माण झाल्या . जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत . तांदळावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी या देशांनी भारताकडे केली आहे.
विशेष म्हणजे भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जातो. जागतिक बाजारपेठेत 40% तांदूळ भारतातून जातो. यामध्ये एकट्या बासमती तांदळाचा वाटा लाखो टन आहे.सरकारच्या या निर्णयामुळे अनेक देशांमध्ये अन्नाचा मोठा तुटवडा असून यामुळे तांदळाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
घरगुती किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तांदूळ निर्यातीवर निर्बंध आणल्याने जागतिक बाजारपेठेत तांदळाच्या किमतींवर परिणाम झाला. बांगलादेश ,नेपाळसह भारताचे शेजारील देश तांदळासाठी भारतावर निर्बंध आहेत . त्यामुळे या देशाची चिंता वाढली आहे.
तांदूळ आयात करणारे देश चिंतेत..
भारतात सर्वाधिक तांदळाची उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते. येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन घेतात. देशातील एकूण उत्पादनात बंगालचा वाटा १३.६२ टक्के आहे. तर प्रदेशमध्ये तांदळाचे उत्पादन हे 12.81% सह दुसऱ्या क्रमांकावर आहे . पंजाब तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याचा एकूण वाटा 9.99% आहे. मात्र यंदा पश्चिम बंगाल ,ओडिसा, झारखंड ,छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या देशातील तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये असमान पावसामुळे यावर्षी भाताच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. यंदा पुरेसा पाऊस न पाऊस झाल्याने तांदळाचे उत्पादन घटले असून केंद्र सरकारने बिगर बसमती तांदूळ निर्यात बंदी केली. त्यामुळे तांदूळ आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली आहे.