भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतु भारतात मागच्या कित्येक वर्षापासून पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. पारंपरिक शेतीमध्ये आता आधुनिकीकरण करण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. भारतासह जगभरात शेतीचे नवीन प्रयोग घेतले जात आहेत.
विविध देशातील शेतीची माहिती घेण्यासाठी 2004 सालापासून राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी परदेश दौरे आयोजित करत आहेत. ही योजना कृषी विभाग राबवित असून ते अंतर्गत प्रस्तावित खर्चाच्या सुमारे एक कोटी 40 लाख रुपयांच्या खर्चाला कृषी विभागांनी अध्यादेश द्वारे मान्यता दिली आहे.
120 शेतकऱ्यांची निवड..
महाराष्ट्रातील जवळपास 120 शेतकऱ्यांना परदेशात जाण्याची संधी राज्य कृषी विभागाच्या या योजनेमुळे मिळू शकते. त्याचबरोबर या अभ्यास दोऱ्यात सहा कृषी अधिकाऱ्यांचाही समावेश असतो.ही योजना राबवण्याची जबाबदारी राज्यातील नोडल अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेली आहे. याबाबत लवकरच सूचना काढण्या चे आदेश त्यांना देण्यात आलेले असून आता कृषी विभागाकडून याबाबत लवकरच शेतकऱ्यांचा विदेश दौरा निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.
परदेश दौऱ्यासाठी पात्रता..
◼️ संबंधित शेतकऱ्यांची शेती असावी,
◼️ त्यांचा सातबारा आठ अ चा उतारा
◼️ त्यांचे वय 21 ते 65 च्या दरम्यान असावे
◼️ संबंधित शेतकऱ्यांचे पासपोर्ट असावा
◼️तसेच तो शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावा संबंधित शेतकऱ्यांनी पूर्वी शासकीय योजनेच्या माध्यमातून परदेश दौरा केलेला नसावा.
◼️ तसेच संबंधित शेतकरी परदेश दौऱ्यासाठी पात्र असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आवश्यक.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपर्क कुठे करावा?
परदेश दौऱ्या संदर्भात कृषी विभाग लवकरच अधिकृत पत्र द्वारे जाहीर सूचना देणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पुणे येथील कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण यांच्याशी संपर्क साधता येईल.