Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले महत्वाचे निर्णय,वाचा सविस्तर ..

काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली . त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते .

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय खालील प्रमाणे… 

✅ यावर्षी सुद्धा मुंबईकरांना मालमत्ता कर वाढ नाही. 

✅ राज्यामध्ये नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करून 2 लाख रोजगार उपलब्ध करून देणार , स्वयंरोजगार निर्माण करणार.

✅ शासन ज्येष्ठ नागरिकांसाठी संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी लाभ देणार. 

✅ आता नगरोत्थान महाभियान राज्यातील सर्व पालिकांमध्ये राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार. 

✅ शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी बांबू लागवडीसाठी अनुदान देणार. 

✅ संपूर्ण राज्यात मधाचे गाव योजना राबवणार. मध उद्योगाला बळकटी मिळणार .

✅ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी. ‘

✅ लमाण ,बंजारा, समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. त्यांना मूलभूत सुविधा देणार

✅ शिर्डीमधील विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी

✅ धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार.

✅ सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते. 

✅ सांगोला मधील स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पास सुधारित मान्यता.

✅ बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार. 

✅ कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामास जादा खर्चास मान्यता. 

✅ तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार. 

✅ नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हजूद सादिब गुरुद्धारा अधिनियम. 

✅ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार. 

✅ आता कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष. 

✅ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय. 

✅ गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद. 

Leave a Reply