PM Kisan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ,या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात 16 हप्ता जाणून घ्या सविस्तर…

पीएम किसान योजनेसंदर्भातील एक अपडेट समोर आली आहे. पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्यासंदर्भातील हि नवीन अपडेट समोर आली आहे. १६ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.करोडो शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.

सर्व शेतकऱ्यांचे १६ व्या हप्त्याची रक्कम कधीपर्यंत जमा होणार याकडे लक्ष लागले आहे. . आता या संदर्भातील तारिख जाहीर झाली असून .लवकरच ही रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत १५ हप्त्यांपर्यंत दोन हजारप्रमाणे असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात अली आहे. आता योजनेच्या १६ व्या हप्त्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. योजनेच्या हप्त्याची रक्कम देशातील जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

१६ वा हप्ता यवतमाळमधून वितरीत होणार आहे .

महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर २८ फेब्रूवारीला २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच दिवशी यवतमाळ येथील कार्यक्रमातून योजनेचा १६ व्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे. १६ व्या हफ्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे.

आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत १५ हप्त्यांपर्यंत ची रक्कम देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. चार महिने झाले तरी १६ व्या हप्त्याबाबत कोणतीच माहिती नसल्याने शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागून राहिले होते.

लोकसभा निवडणुकांची घोषणा कधीही होण्याची शक्यता असल्यामुळे योजनेचा १६ हप्ता कधी मिळणार , अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. आता १६व्या हफ्त्याची तारीख जाहीर झाली असून लवकरच हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *