![](https://krishi24.com/wp-content/uploads/2024/02/म्हशींमधील-होणारा-लालमूत्र-आजार-व-त्यावर-उपाय-पहा-सविस्तर.webp)
लालमूत्र आजाराचे मुख्य कारण म्हशीच्या आहारात स्फुरद खजिनाची कमतरता आणि दुभत्या तसेच शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशींमध्ये स्फुरद खनिजाची तुलनेने वाढलेली गरज हे लालमूत्र आजाराचे प्रमुख कारण आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे चाऱ्यातील स्फुरदचे प्रमाण कमी झाले आहे.
त्यामुळे म्हशींना आवश्यक मात्रेमध्ये स्फुरद उपलब्ध न झाल्याने लाल मूत्र हे दिसून येत आहे.म्हशींना संतुलित आहार आणि खनिज मिश्रणांचा पुरवठा करावा.
कमी पर्जन्यमान राहिल्याने चाऱ्याचे दुर्भिक्ष यंदा सद्यपरस्थितीत दुष्काळबाधित क्षेत्रात आढळून येत आहे.त्या कारणामुळे बहुतांश पशुपालक दुधाळ जनावरांचा वाळलेला चारा, असेल तर थोडा-फार हिरवा चारा आणि कमी मात्रेत खुराक देत असून सध्याच्या परिस्थितीमुळे दुधाळ तसेच गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या म्हशींमध्ये स्फुरद कमतरतेमुळे लाल मूत्र आजार दिसून येत आहे .आहारविषयक बाबीची काळजी हा आजार टाण्यासाठी घेणे आवश्यक आहे.
आर्थिक दृष्टीने म्हशींमध्ये लाल मूत्र (पोस्ट पार्च्यूरियंट हिमोग्लोबिनयुरिया) हा उत्पादकतेशी निगडित महत्त्वाचा आजार आहे. आजाराने बाधित या म्हशीमध्ये शरीरातील स्फुरदचे प्रमाण कमी झाले आहे .
हा आजार दुग्धउत्पादन देणाऱ्या म्हशींमध्ये प्रामुख्याने जास्त आढळून येतो. यामुळे बाधित म्हशीचे दूध उत्पादन घटते, उपचारा वर मोठा खर्च करावा लागतो. वेळेवर उपचार न झाल्यास म्हैस दगावू शकते. हा आजार प्रामुख्याने शरीरातील स्फुरदचे प्रमाण कमी झाल्यानंतर उद्भवतो.दुधाळ म्हशीच्या आहारात स्फुरदची कमतरता असेल तर ती गरज आहारातून पूर्ण होत नाही. या कारणामुळे अशा म्हशी आजारात बळी पडतात.
या आजाराचे जास्त प्रमाण गाभणकाळातील शेवटचे तीन महिने किंवा विल्यानंतर पहिले एक ते तीन महिने या काळा वधी मध्ये आढळून येते म्हशीच्या आहारात स्फुरद खनिजाची कमतरता आणि दुभत्या तसेच शेवटच्या टप्प्यातील गाभण म्हशीमध्ये स्फुरद खनिजाची तुलने वाढलेली गरज हे आजाराचे प्रमुख कारण आहे.
महाराष्ट्रातील बऱ्याच भागातील जमिनीमध्ये स्फुरदचे प्रमाण कमी असून, अशा जमिनीमधील स्फुरदचे प्रमाण गवत किंवा चारा वार्गीय पिकांमध्ये कमी असते. हे स्फुरदचे प्रमाण पर्जन्यमान कमी झाल्याने अजून कमी होवून म्हशी या आजारास बळी पडण्याचे प्रमाण वाढू लागतील.स्फुरदचे प्रमाण वाळलेल्या चारांमध्ये अत्यंत कमी असते. वाळलेल्या चाऱ्यातील स्फुरदचे प्रमाण हे हिरव्या चारा आणि खुराकांमधील स्फुरदच्या तुलनेत अनुक्रमे दोन ते तीन आणि चार पटीने जास्त असते.
ज्यांच्या आहारात फक्त वाळलेला चारा ज्यामध्ये स्फुरदचे प्रमाण अगदी नगण्य असते हा आजार प्रामुख्यान अशा म्हशीमध्ये आढळून येतो. चारा व खुराक वाळलेल्या चारा बरोबर अत्यंत कमी प्रमाणात दिला जातो. शेवटच्या टप्प्यातील गाभण आणि नवीन व्यायलेला म्हशीच्या आहारात जास्त काळ वाळलेला चारा दिल्यास किंवा आहारात खुराक आणि हिरवा चारा कमी प्रमाणात उपलब्ध असल्या कारणाने किंवा आहारात या घटकाचा समावेश नसल्याने व नियमित खनिज क्षार मिश्रण आहारात नसल्यास जास्त दूध देणाऱ्या म्हशीमध्ये आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
आजाराची लक्षणे :-
– आजाराने बाधित म्हशीमध्ये लाल, कॉफीच्या रंगाची लगवी होते.
– म्हशी शेन टाकताना कुथतात.
– खाणे, पिने मंदावते, वजन घटते, अशक्तपणा वाढून जनावर मलूल बनते.
– दूध उत्पादन घटते.
– जरी शरीराचे तापमान सर्वसाधारण असले तरी श्वस आणि नाडीचा वेग वाढतो.
– तीव्र स्वरूपाच्या रक्तक्षय होतो (डोळ्यातील श्लेश्ल्म्लपटल पांढरे किंवा कावीळ झाल्यास पडतात)
– बाधित म्हशीवर वेळेवर उपचार केला नाही तर तीव्र स्वरूपाचा रक्तक्षय होवून चार ते पाच दिवसात बाधित
म्हशी दगावण्याची शक्यता आहें.
आजाराचे निदान :-
– आजार प्रामुख्याने नव्याने व्यायलेल्या किंवा डिसेंबर ते जुलै दरम्यान गाभण काळाच्या शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या म्हशीमध्ये आढळून येतो. दुष्काळी परिस्थितीतही या आजाराचा प्रादुर्भाव दिसून येतो.
– आजाराचे प्राथमिक निदान अशक्तपणा ,कुंथुन शेन टाकणे आणि लालसर किंवा कॉफी सारख्या रंगाची लघवी होणे. यासारख्या लक्षणावरून करता येते.
– रक्तजल नमुने प्रयोगशाळेत तपासून रक्तामधील स्फुरदचे प्रमाण कमी (४ ग्राम प्रत्येक १०० मिली रक्तापेक्षा कमी) झाल्यास आजाराचे निदान करता येते.
– औषधोपचार :-
– आजाराचे तत्काल निदान करून पशुवैद्यकाकडून योग्य आणि आवश्यक उपचार करून घेतल्यास बाधित म्हशी या आजारापासून वाचू शकता.
– आजाराची जास्त तीव्रता होवून रक्तातील हिमोग्लोबिन ५ ग्रॅमच्या खालील गेल्यास बाधित म्हशीमध्ये रक्त संक्रमण करावे लागते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना :-
– चांगली दुग्धउत्पादकता असलेल्या म्हशीच्या आहारातील स्फुरद खनिजाचे व्यवस्थित नियोजन केल्यास या आजाराला आळा घालता येवू शकतो.
– गाभण व दुभत्या म्हशींच्या आहाराचे योग्य व्यवस्थापन करून पुरेश प्रमाणात स्फुरद खनिजाची गरज भरून निघते.
-आहारातील शुष्क पदार्थाचा तुलनेत 0.32 ते 0.36% स्फुर आहारात दिल्यास म्हशीमध्ये स्फुरद कमतरता टाळता येते. एक लिटर दूध उत्पादनासाठी ०.९ ग्रॅम स्फुरदची गरज पडतेय . सर्वसाधारणपणे प्रोढ ४०० किलो वजनाच्या म्हशींच्या आहारामध्ये 12 ते 13 ग्राम अतिरिक्त स्फुरद देणे गरजेचे असते.
– हिरव्या चाऱ्यामध्ये स्फुरदचे प्रमाण 0.2% आणि खुराकांमध्ये ०.४ ते ०.६ टक्के असते. वाळलेल्या चाऱ्यामध्ये हे प्रमाण अगदी नगण्य असते. हा आजार टाळण्यासाठी आहारा मध्ये हिरवा चारा आणि खुराक नियमित म्हशींना देणे गरजेचे आहें.
– दुधाळ म्हशींना संतुलित आहाराबरोबर नियमित 50 ग्रॅम खनिज क्षार मिश्रण पुरवठा केल्यास सफुरद खनिजाची गरज पूर्ण होते. हा आजार पूर्णपणे टाळता येतो.
– गरजेप्रमाणे अतिरिक्त स्फुरद खनिजाचा समावेश संवेदनशील कालावधीमध्ये आहारात करावा.