20 गुंठ्यात मिळवले पाच लाखांचे उत्पन्न, तैवान पेरू ला पर राज्यात देखील मोठी मागणी !

सतत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीडच्या ग्रामीण भागातील या फळाला आता गुजरात आणि हैद्राबादच्या मार्केट मध्ये मोठी मागणी असल्याचं ऋषीकेश पुरी या शेतकऱ्याने सांगितले.
 
बीड : पारंपारिक शेती (Traditional farming) परवड नाही, त्यामुळे अनेक शेतकरी (Beed Farmer) वेगळा प्रयोग करुन त्यामधून चांगले पैसे कमावतात असं अनेकदा दिसून आलं आहे. मुळात पारंपारिक शेती परवत नसल्यामुळे कर्जबाजारी होण्यापेक्षा  फळबाग लागवड (Orchard planting) करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. फळबाग शेतीतून येणारं उत्पन्न चांगलं असल्यामुळे शेतकरी सुध्दा समाधानी आहेत. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उमरी शेतकरी ऋषीकेश पुरी (Farmer Rushikesh puri)याने केलेल्या फळबाग शेतीतून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. त्यामुळं त्याचं सगळीकडे कौतुक सुरु आहे.
केज तालुक्यातील उमरी येथील शेतकरी ऋषीकेश पुरी या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत फळबाग लागवड केली आहे. केवळ वीस गुंठ्यात तैवान जातीच्या पेरुची लागवड केली असून पहिल्याच फेऱ्यात साडेचार लाख रुपयांचा आर्थिक नफा झाला झाला आहे. सलग दुसऱ्या वर्षी फळं चांगली आली असून यंदा पाच लाखांचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे. सतत दुष्काळी समजल्या जाणाऱ्या बीडच्या ग्रामीण भागातील या फळाला आता गुजरात आणि हैद्राबादच्या मार्केट मध्ये मोठी मागणी असल्याचं ऋषीकेश पुरी या शेतकऱ्याने सांगितले.

Source: tv9marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *