‘शेती करत असताना कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संतुलन राखता येते. शेतकरी आर्थिक फायदाही कार्बन क्रेडीटच्या रूपाने मिळवू शकतात . जैन फार्म फ्रेश फुड्चे संचालक अथांग जैन यांनी यासाठी शेतकऱ्यांनी जैन कार्बन क्रेडीट योजनेत सहभागी व्हावे,’’ असे आवाहन केले आहे.
हरित गृह वायू उत्सर्जन कमी करणे आणि मातीत सेंद्रिय कार्बन सुधारणेसाठी प्रकल्पासाठी भागधारक परामर्श बैठकीत जैन इरिगेशनच्या हवामान स्मार्ट शेती आधारित त्यांनी आपले विचार मांडले
या वेळी सुरत येथील श्री सायन शुगर फॅक्टरी सायन अध्यक्ष राकेश पटेल, स्मार्ट प्रोजेक्ट आत्मा संस्थेचे श्री जाधवर, श्रीकांत झांबरे, कापूस संशोधन केंद्राचे गिरीश चौधरी,ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, तेलबिया संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. डी. व्ही. दहात, तज्ज्ञ आशिष सोनी, धर्मेश पटेल, यशदाच्या कल्पना पाटील, शुभांगी भोळे (नाशिक) प्रमुख पाहुणे सहभागी होते. जगभरातील विविध भागातील अभ्यासक,तज्ज्ञ, शेतकरी देखील दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते .
टिश्यु कल्चर केळी लागवड कार्बन क्रेडीटसाठी मोलाची भूमिका
ऐच्छिक कार्बन मार्केट स्टँडर्ड अंतर्गत जैन इरिगेशन आणि जैन फार्म फ्रेश हा प्रकल्प विकसित करीत आहे, यासंबधी हा कार्यक्रम झाला. डॉ. जनमेजय नेमाडे, डॉ. निर्मला झाला, डॉ. अनिल ढाके, डॉ. जयश्री राणे व सहकाऱ्यांनी पहिल्या सत्राच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. जैन इरिगेशनचे केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी कार्बन क्रेडिट या विषयाच्या संदर्भात केळी पिकामुळे कार्बन उत्सर्जन कसे कमी करते याबाबत मार्गदर्शन करत असताना सांगितले की, जैन टिश्युकल्चर तंत्रज्ञानाने मागील ३० वर्षात साध्य केले आहे.
केळीच्या पिकाला पूर्वी २० ते २२ महिने लागत होते . त्या मधून प्रतिहेक्टर केळीचे २५ टन उत्पादन होत होते. आज शेतकरी जैन टिश्युकल्चर केळीचे २० महिन्यात दोन पीक घेत आहेत त्यामुळे ५० किलो उत्पादन एका झाडापासून २० महिन्यात मिळत आहे. यासोबतच एकरी १५० टन एका पिकातून बायोमास मिळत आहे . तसेच दोन पिकापासून ३०० टन बायोमास जमिनीत गाडला जात आहे त्यामुळे जमिनीचा ऑरगॅनिक कार्बन वाढी साठी मदत होत आहे .
शेतकरी आणि पर्यावरण कार्बन क्रेडीट प्रकल्प ह्यांना लाभदायी
ठिबक सिंचन हे सिंचनाचे किंवा पिकांना पाणी देण्याचे साधन नसून पाणी वापरात बचत या माध्यमातून होते तसेच पिकांचे उत्पादन वाढी साठी मदत होते तसेच विजेची ३३ टक्के बचत या तंत्रज्ञानामुळे होते.असे जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे म्हणाले
या तंत्रज्ञानामुळे रासायनिक खताच्या वापरामध्ये ही ३० टक्के बचत होण्यास मदत होते . ऊस, कापूस या पिकांमध्ये ठिबक सिंचन तंत्राचा मोठ्या प्रमाणावर जैन इरिगेशनच्या पुढाकारामुळे वापर होत आहे. राज्यामध्ये ठिबक सिंचनाचा सर्वात जास्त वापर कापूस पिकाकरिता होत आहे.शेतकऱ्यांमध्ये ऊस पिकाकरिता खूप पाणी लागते हा गैरसमज आहे.












