११ कोटी ३२ लाख ४९ हजार ८३५ रुपये इतके अनुदान गोकुळ सलंग्न दूध उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार आहे. गोकुळ हा राज्यातील प्रथम क्रमांकाचा संघ आहे ज्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळवले आहे. दूध उत्पादकांच्या व संघाच्या उत्कर्षासाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी असे प्रतिपादन केले.
शासनाच्या प्रतिलिटर ५ रुपये गाय दूध अनुदान योजनेचे काम गोकुळ संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद नारायण जोशी यांनी कमी वेळेत व चागंल्या पद्धतीने पूर्ण केल्याबदल ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि ‘गोकुळ’तर्फे संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . गोकुळ शिरगाव येथे कार्यक्रम झाला. या वेळी ते बोलत होते.
प्रतिलिटर ५ रुपये गाय दूध अनुदान योजना राज्य शासनाने जाहीर केली होती, ही अनुदान योजना जाहीर केली तेव्हा शासनाने त्यामध्ये घालण्यात आलेल्या अटीमुळे व जाचक नियमांमुळे व अनेक शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही , त्यामुळे महाराष्ट्रातील आजपर्यंत अगदी मोजक्या दूध संघांना आणि त्यापैकी अगदी फार कमी दूध उत्पादकांना या ५ रुपये अनुदान योजनेचा लाभ मिळालेला आहे.अशी माहिती अध्यक्ष डोंगळे यांनी या वेळी दिली ,
‘गोकुळ’ने अशा परिस्थितीमध्ये या दूध अनुदान योजनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून दाखवले व दूध उत्पादकांना जवळपास ११ कोटी ३२ लाख इतके अनुदान मिळेल, अशी माहिती शासनाकडे अपलोड करण्यात आली आहे.
यासाठी संघाच्या संगणक विभागाचे व्यवस्थापक अरविंद जोशी व त्यांच्या टीमने जास्तीत जास्त दूध उत्पादकांचा डाटा संघाकडे जमा केला आहे. यावेळी संचालक बाबासाहेब चौगले, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील-चुयेकर,अभिजित तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील,नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, रणजितसिंह पाटील,बाळासो खाडे, चेतन नरके, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, योगेश गोडबोले सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, उपस्थित होते.












