केंद्र सरकारचा मोठा निर्णय कांद्याचे निर्यतीवरील बंदी उठवली परंतु निर्यात शुल्क मोठ्या प्रमाणात लागू…

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे . सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी उठवली आहे. दरम्यान,सरकारने एका बाजूला जरी निर्यातबंदी उठवली असली तरी, दुसऱ्या बाजूला प्रति मेट्रिक टन किमान 550 डॉलर निर्यात शुल्क लागू करण्यात आला आहे. निर्यात शुल्क आकारल्यामुळे देशात कांद्याच्या किंमती वाढणार नाहीत, याची सरकारने दक्षता घेतली आहे असे बोलले जात आहे .

7 डिसेंबर 2023 ला लागू केली होती निर्यातबंदी..

लोकसभेच्या निवडणुका सध्या देशात चालू आहे. या निवडणुकांच्या काळातमध्ये सरकारने मोठा निर्णय घेतला आहे . कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवली आहे. परंतु , 550 डॉलर प्रति मेट्रिक टन किमान निर्यात मूल्य ठेवण्यात आले आहे.कांद्याची निर्यात या निर्यात मूल्याने करने शक्य होणार आहे. दरम्यान, शेतकरी आणि निर्यातदारांना केंद्र सरकारने 7 डिसेंबर 2023 ला निर्यातबंदी लागू करण्यात आल्याने या निर्यातबंदीच मोठ्या प्रमाणात फटका बसत होता. यानंतर काही देशामध्ये NCEL च्या माध्यमातून निर्यात सुरू करण्यात आली होती. परंतु याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. शेवटी काल रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा नवीन निर्णय घेतला आहे . निर्यातदारांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, यामुळं शेतकऱ्यांनाही निश्चित फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले .

कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय..

दरम्यान, एका बाजूला जरी सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंधने हटवली असली तरी देखील दुसऱ्या बाजूला मोठया प्रमाणावर निर्यातीवर शुल्क आकारण्यात येणार आहे . सरकारनं हा निर्णय कांद्याचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी घेतला आहे . निर्यातीवर शुल्क आकारल्या मुळे फार काही शेतकऱ्यांना फायदा होईल असे म्हणता येणार नसल्याचे मत काही शेतकऱ्यांनी मांडले आहे. गेल्या वर्षी देखील कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क  आकारण्यात आले होते. डिसेंबर 2023 पर्यंतच हे निर्यात शुल्क होते. दरम्यान, आता पुन्हा सरकारने निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी..

कांद्याच्या निर्यातीवर बंदी असतानाही सरकारने शेजारील सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली होती सरकारकडून सुमारे एक लाख टन कांदा निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली होती. यामध्ये बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, बहारीन, मॉरिशस ,भूतान, आणि श्रीलंका या सहा देशांचा समावेश आहे. 99 हजार 150 टन कांदा निर्यात या सर्व 6 शेजारी देशांना मिळून केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *