
तुमच्या सातबारा किंवा मिळकत पत्रिकेमध्ये जमिनीसंदर्भामध्ये कोणत्याही स्वरूपाचा काही बदल होत असल्यास त्यांची माहिती तुम्हाला लगेच कळणार आहे. भूमी अभिलेख विभागाच्यावतीने यासाठी काही नाममात्र शुल्क आकारून ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा लवकरच सुरु करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता भूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर फेरफार नोंदी अथवा मोजणीच्या नोटीस यांची माहिती घेण्यासाठी सारखेसारखे जाऊन तपासणी करण्याची गरज राहणार नाही.
नागरिकांना जास्तीतजास्त ऑनलाइन सुविधा देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. भूमी अभिलेख विभागाने ‘अधिकार अभिलेख’ म्हणजे सातबारा उतारा किंवा मिळकत पत्रिकांचे डिजिटायझेशन केले आहे. तसेच फेरफार उताऱ्यावर शंभर टक्के नोंदी या ऑनलाइन घेण्यात येत आहेत . त्याच बरोबर जमिनींच्या मोजणीची नोटीस अर्जदारांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई मोजणी व्हर्जन- २ हा पर्याय ही देण्यात येणार आहे .
मात्र , आजही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधातील कुठल्या प्रकाराची कारवाई सुरू आहे, याची माहिती घायची असल्यास त्यासाठी नागरिकांना महाभूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जाऊन ती घ्यावी लागते.मात्र , आजही जमिनीच्या मालकी हक्कासंबंधातील कुठल्या प्रकाराची कारवाई सुरू आहे, याची माहिती घायची असल्यास त्यासाठी नागरिकांना महाभूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर जाऊन ती घ्यावी लागते.भूमी अभिलेख विभागाने ही नेमकी गरज ओळखून आता ‘नोटिफिकेशन अपडेशन पोर्टल’ची सुविधा सुरु करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
जमिनींच्या मालकी हक्कात मोजणी किंवा फेरफारमध्ये बदल, अशा दोन्ही प्रकारच्या माध्यमातून प्रामुख्याने बदल होत असतो
भूमी अभिलेख विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या या सुविधेमुळे एखाद्या जमिनींमध्ये मोजणीच्या माध्यमातून अथवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदल होत असतील तर याची माहिती संबंधित जमीन मालकास तत्काळ मिळणार आहे. आता यासाठी जमिनींच्या मालकांना महाभूमी अभिलेख विभागाच्या पोर्टलवर नजर ठेवण्याची आवश्यकता राहणार नाही.नागरिकांना अल्पदरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे भूमी अभिलेख विभागाने दिला आहे.या पोर्टलच्या विकासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
– सरिता नरके, अतिरिक्त जमाबंदी आयुक्त, भूमी अभिलेख विभाग
अशी आहे सुविधा…
राज्य सरकारकडून नाममात्र दर निश्चित झाल्यानंतर प्रती मिळकत दरवर्षी तितकेच शुल्क शासनाकडे जमा करावे लागणार आहे. जेव्हा कधी त्या मिळकतीवर मोजणी माध्यमातून हद्दीत किंवा फेरफारच्या माध्यमातून मालकी हक्कात बदलाबाबत कोणतीही कार्यवाही सुरू असली , तर त्याचा एसएमएस ही सुविधा घेणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर येणार आहे.जर त्यामध्ये ई-मेल नोंदविला असल्यास त्यावरही याबाबतची माहिती मिळेल. मिळकतीच्या सातबारा किंवा मिळकत पत्रिकेबाबत माहिती मिळत राहणार आहे.