केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय, 14 पिकांच्या हमीभावात वाढ खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा…

पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने नुकतेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17 वा हफ्ता वर्ग केला आहे. या वर्षी शेतकऱ्यांना या निर्णयामुळे पिकाच्या विक्रीनंतर चांगला आर्थिक फायदा होईल . तसेच आता खरीप हंगामातील एकूण 14 पिकांसाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे.

एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (19 जून) मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. कपाशी ,धान, अशा महत्त्वाच्या पिकांसह एकूण 14 पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारने वाढ केली आहे.  त्यानंतर हमीभावासंदर्भात याच बैठकीत निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय

केंद्र सरकारने 2018 साली पिकाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला होता,असे अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली .तसेच बुधवारी हाच नियम लक्षात घेऊन केंद्र सरकारने नवे हमीभाव ठरवले आहेत. धान या पीकाचे प्रति क्विंटल 2300 रुपये हमीभाव ठरवण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा भाव 117 रुपयांनी जास्त आहे. 2013-14 मध्ये धान या पिकाचा हमीभाव 1310 रुपये प्रति क्विंटल होता.केंद्र सरकारने कपाशीपासून ते धान या पिकापर्यंत एकूण 14 महत्त्वाच्या पिकांचा हमीभाव वाढवला आहे.

खालील पिकांचा हमीभाव वाढवा, नवा दर काय?

ज्वारी- 3,371 रुपये प्रति क्विंटल

सूर्यफूल- 7,280 रुपये प्रति क्विंटल

सोयाबीन- 4,892 रुपये प्रति क्विंटल

नाचणी- 2,490 रुपये प्रति क्विंटल

बाजरी- 2,625 रुपये प्रति क्विंटल

मूग- 8,682 रुपये प्रति क्विंटल

तूर- 7,550 रुपये प्रति क्विंटल

मक्का- 2,225 रुपये प्रति क्विंटल

उडीद- 7,400 रुपये प्रति क्विंटल

तीळ- 9,267 रुपये प्रति क्विंटल

भुईमूग- 6,783 रुपये प्रति क्विंटल

रेपीसीड- 8,717 रुपये प्रति क्विंटल

तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा सरकारच्या या निर्णयामुळे मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *