प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली घोषणा..

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नियमित आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडतो. अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सूचना केल्या आहेत तसेच किती रक्कम लागते ती वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीअगोदर ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेत केली. ६ हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी वर्ग करूनच राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडलो आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर हि सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, बाजार समिती सभापती प्रवीणसिंह पाटील, नवीद मुश्रीफ,वसंतराव धुरे,सतीश पाटील, चंद्रकांत गवळी ,आमरीन मुश्रीफ, विलास गाताडे, सुधीर देसाई, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. असे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले. माझ्यासाठी सहा महिन्यांपासून निवडणुकीकरिता कार्यकर्ते सज्ज झाले आहेत प्रवीण काळबर,शीतल फराकटे, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने विजय काळे, यांची भाषणे झाली. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी स्वागत केले. नितीन दिंडे यांनी आभार मानले.

मंत्री मुश्रीफांची उमेदवारी जाहीर..

मागे एकदा मुश्रीफांना पालकमंत्री करू शकलो नाही, ही खंत यावेळी दूर केली.असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, त्यांच्या मागे असणारी ताकत कागलकरांनी कधीच कमी केलेली नाही. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना जास्तीत जास्त उच्चांकी मताने निवडून द्या की, समोरच्याला धडकी भरली पाहिजे.

मुश्रीफांनी मागितली माफी

सभेला महिलांची संख्या जास्तीची होती, मेळाव्याला मोठी गर्दी जमा झाली होती. . सभामंडपाबाहेर लोक दाटीवाटीने उभा होते.तेथेही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशवंतराव घाटगे विद्यालयाच्या पटांगणात स्क्रीन उभारला होता. पावसामुळे इतके लोक येणार नाहीत त्यामुळे ही जागा निवडली .यामुळे गैरसोय झाली. याबद्दल मुश्रीफ यांनी भाषणामध्ये माफी मागितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *