वर्षभरात गव्हाची निर्यात घटली ; जागतिक बाजारपेठ गमावण्याची शक्यता,वाचा सविस्तर ..

जगाचा गहू पुरवठादार असलेल्या भारतावर गहू आयात करण्याची वेळ आली आहे. तब्बल ९६ टक्के मागील वर्षी निर्यात घटली आहे , आयात ८५ टक्के वाढली आहे. भारत जगातील ७१ देशांमध्ये गहू निर्यात करत होता, ही संख्या आता १२ वर आली आहे. तब्बल ३०३०१ टन गहू आयात २०२४ – २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये करावी लागली असून, वर्षभरात हा आकडा आणखीन वाढणार असल्याची शक्यता आहे.

रशिया व युक्रेन युद्धानंतर भारतीय जागतिक बाजारपेठेमध्ये गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती. भारताने जगातील ७२ लाख ३९ हजार टन गहू पुन्हा २०२२ – २३ या वर्षात गहू निर्याती मध्ये घट झाली. देशातील घटलेले उत्पादन व लोकसभा निवडणूक यामुळे गहू निर्यात २०२३ – २४ या आर्थिक वर्षात बंद केली २०२३ – २४ या आर्थिक वर्षात देशातील घटलेले उत्पादन व लोकसभा निवडणूक यामुळे गहू निर्यात बंद केली. त्यामुळे तब्बल ९६ टक्के निर्यात एका वर्षात कमी झाली.

मागणी वाढली होती, पण…

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य व्यापाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ३ वर्षांपूर्वी रशिया व युक्रेन युद्धामुळे भारतीय गव्हाला जगभर मागणी वाढली होती. परंतु , उत्पादन वाढविण्यात अपयश आल्यामुळे निर्यातीमध्ये घट निर्माण झाली . जागतिक बाजारपेठ गमावण्याची वेळ आली आहे असे धान्य व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

तीन वर्षांतील गहू निर्यातीचा तपशील


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *