सोयाबीनला या बाजारात मिळाला पाच हजाराचा भाव, आजचे सोयाबीन बाजारभाव असे आहेत

सोयाबीनच्या शेतकºयांना बाजारभाव (soybean bajarbhav) कधी वाढतील याची प्रतीक्षा असताना आज दिनांक 16 नोव्हेंबर 24 रोजी राज्यातील एका बाजारसमितीत सोयाबीनने प्रति क्विंटल 5 हजारापेक्षा जास्त बाजारभाव मिळवला आहे. दरम्यान कालच्या तुलनेत आज बाजारातील सोयाबीनचे (today’s soybean market price) भाव टिकून राहिले असून काही ठिकाणी किरकोळ भाव वाढ दिसून आली. धुळे बाजारसमितीत अवघ्या 30 रुपयांनी, तर छत्रपती संभाजीनगर बाजारसमितीत सुमारे 200 रुपयांनी सोयाबीनचे सरासरी बाजारभाव वधारले आहेत.

आज लातूर जिल्ह्यात सोयाबीनची (पिवळा) 28 हजार 633 क्विंटल इतकी आवक झाली. या ठिकाणी सोयाबीन बाजार भाव कमीत कमी 4181 रुपये तर सरासरी 4200 रुपये असा प्रति क्विंटलला मिळाला. परतूर बाजारसमितीत सरासरी 4300 रुपये, किनवट बाजारसमितीत सरासरी 4892 रुपये असा दर मिळाला.

मात्र या ठिकाणी आवक अनुक्रमे अवघी 67 आणि 38 क्विंटल इतकी होती.

अमरावती बाजारसमितीत लोकल जातीच्या सोयाबीनला कमीत कमी चार हजार रुपये तर सरासरी चार हजार 150 रुपये असा बाजार भाव मिळाला. या ठिकाणी सोयाबीनची तब्बल 13 हजार 368 क्विंटल आवक झाली.

दरम्यान राज्यात आज सोयाबीनला सर्वाधिक बाजारभाव सांगली बाजारसमितीत मिळाला. या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी 4892, सरासरी 5 हजार 46 आणि जास्तीत जास्त 5 हजार 200 असा बाजारभाव मिळाला. मात्र या बाजारात आज सोयाबीनची आवक केवळ 50 क्विंटल इतकीच झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *