आज दिनांक 16 नोव्हेंबर 24 रोजी राज्यातील बाजारसमित्यांमध्ये ज्वारीची 5 हजार 400 क्विंटल आवक झाली. कालच्या तुलनेत ही आवक जवळपास दुप्पट होती.
मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्हयातील बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला बºयापैकी भाव मिळत असून आजही ते भाव टिकून आहेत. आज पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीची 696 क्विंटल इतकी आवक झाली. कमीत कमी बाजारभाव 4400 रुपये तर सरासरी बाजारभाव 4800 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
सोलापूर बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला सरासरी 2320 रुपये, तर कर्जत बाजारसमितीत सरासरी 2650 रुपये असा दर मिळाला. जामखेड, जि. अहिल्यानगर येथे मालदांडी ज्वारीला सरासरी 3600 रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.
जळगाव जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा आणि अमळनेर बाजारात दादर ज्वारीला अनुक्रमे सरासरी 3 हजार,2500, 2511 रु असा बाजारभाव मिळाला.
दरम्यान तासगाव येथे शाळू ज्वारीला सरासरी 3480 असा प्रति क्विंटल दर मिळाला, जालना येथे 2511, सांगली येथे 3750, तर छत्रपती संभाजीनगर येथे 2201 रु. प्रति क्विंटल असा बाजारभाव मिळाला.
हायब्रीड ज्वारीला राज्यात आज सरासरी 1800 ते 2500 रुपये प्रति क्विंटल असे दर मिळताना दिसले.