कालच्या तुलनेत आज राज्यातील बाजारसमित्यांमध्ये खरीपातील लाल कांदद्याचे दर काहीसे घसरलेले दिसून आले. उन्हाळी कांदद्याचे भावही घसरले होते. लाल कांदद्याला सरासरी 2 हजार ते 2700 असे दर मिळाल्याचे चित्र आहे. आज राज्यात एकूण 94 हजार 509 क्विंटल इतकी कांदा आवक झाली. कालच्या तुलनेत ही आवक कमी असली, तरी बाजारभावातील घसरणही बºयापैकी होती.
कालच्या तुलनेत उन्हाळी कांद्याचे बाजारभाव सरासरी 200 ते 900 रुपयांनी घसरल्याचे दिसून आले, तर लाल कांदद्याचे बाजारभाव साधारणत: 100 ते 300 रुपयांनी घसरल्याचे दिसून आले.
सोलापूरला आज दिनांक 16 नोव्हेंबर रोजी लाल कांद्याची 38 हजार 803 क्विंटल आवक झाली असून दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. या बाजारसमितीत आज लाल कांदद्याचे बाजारभाव कमीत कमी 300 रुपये प्रति क्विंटल इतके घसरले. तर सरासरी कांदा बाजारभाव 2 हजार रु. इतके होते.
सोलापूर बाजार समितीपेक्षाही धुळे बाजारात आज लाल कांद्याला सर्वात कमी बाजारभाव मिळाला. या ठिकाणी कमीत कमी केवळ 100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर सरासरी 4 हजार बाजारभाव मिळाला. या ठिकाणी 464 क्विंटल लाल कांदा आवक झाली.
आज लासलगाव बाजार समितीत लाल कांदद्याला कमीत कमी 1600 रुपये तर सरासरी 4500 रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे. आज लासलगाव बाजारात लाल कांदद्याची 2244 क्विंटल इतकी आवक झाली.
उन्हाळी कांद्याला आज लासलगाव बाजारसमितीत कमीत कमी 2900 रुपये, तर सरासरी 4700 रुपये प्रति क्विंटल इतका बाजारभाव मिळाला. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत उन्हाळी कांदद्याला सरासरी 5600 रुपये बाजारभाव मिळाला.