Garlic Price : मागील तीन-चार दिवसांपासून सुमारे ४५ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचलेले लसणाचे बाजारभाव आज (दि. २९ नोव्हें) बऱ्यापैकी खाली आले असून अनेक ठिकाणी लसणाच्या बाजारभावात सुमारे १ हजार ते ४ हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले
पुणे बाजारसमितीत आज लसूण आवक ८२ क्विंटलने घटून आज १२१९ क्विंटल इतकी झाली. या ठिकाणी लसणाला कमीत कमी बाजारभाव २० हजार रुपये तर सरासरी बाजारभाव २७ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका होता. सोलापूर बाजारसमितीत सरासरी बाजारभावात आज सुमारे ४७०० रुपयांची घसरण होऊन प्रति. क्विंटल २३५००० रुपये सरासरी बाजारभाव मिळाला.
तर अकोला बाजारसमितीत कालच्या तुलनेत ६५ क्विंटलने लसूण आवक वाढली. आज या ठिकाणी ९० क्विंटल लसूण आवक होऊन सरासरी बाजारभावात कालच्या तुलनेत १ हजार रुपयांची घसरण होऊन तो प्रति क्विंटल २९००० रु. असा होता.
दरम्यान राज्यातील प्रमुख बाजारसमितीत आजचे लसणाचे प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत.
अकोला: 29000
चंद्रपूर – गंजवड: 35000
श्रीरामपूर: 25000
राहता: 30000
नाशिक: 22300
कल्याण: 27000
अमरावती- फळ आणि भाजीपाला 22500
सांगली –फळे भाजीपाला 22000
पुणे -27500
पुणे-मोशी -20000
कामठी -30000