
Maharashtra Weather : उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका काकयम आहे. पुण्यासह पश्चिम पट्ट्यातही थंडीचा कडाका जाणवत आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहण्याची तर दिनांक 02 व 03 डिसेंबर रोजी मराठवाड्यात तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील तीन दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमानात पुढील चोवीस तासात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू 3 ते 5 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 29 नोव्हेंबर ते 05 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व दिनांक 06 ते 12 डिसेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.