*4G coverage: भारत हा विविध भाषा आणि परंपरांनी नटलेला देश आहे. भारताचा विस्तार चारही दिशांना खूप मोठा आहे. तसेच भौगोलिक स्थितीमुळेही भारतात विविधता आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी दुर्गम परिस्थिती असल्याने आजही दळणवळणाची साधने कमी आहेत किंवा उपलब्ध नाहीत.
अलीकडच्या काळात ही स्थिती बदलली असून भारतात बहुतेक खेड्यांमध्ये आता ४जी मोबाईलची रेंज येते. आपल्या देशात एकूण 6 लाख,44 हजार ,131 गावे असल्याची नोंद भारतीय रजिस्ट्रार जनरल मध्ये करण्यात आली आहे. या घडीला त्यापैकी सुमारे 6 लाख,22 हजार,840 गावांमध्ये मोबाईल कव्हरेज उपलब्ध आहे आणि यापैकी पर्यंत 6 लाख,14 हजार,564 गावे 4G मोबाइल कनेक्टिव्हिटीने कव्हर करण्यात आली आहेत. ही आकडेवारी ३० सप्टेंबर २४पर्यंतची आहे.
आदिवासी कार्य मंत्रालयाच्या प्रधान मंत्री आदिवासी न्याय महाअभियान (पीएम जनमन) मिशन अंतर्गत, 4,543 विशेषत: असुरक्षित आदिवासी गट (PVTG) वस्त्या मोबाईल कनेक्टिव्हिटीपासून वंचित म्हणून ओळखल्या गेल्या आहेत आणि त्यापैकी 1,136 PVTG वस्त्या मोबाईलने कव्हर केल्या आहेत. कनेक्टिव्हिटी गेली आहे.
दरम्यान आगामी काळात आणखीही गावे मोबाईलच्या रेंजमध्ये तर काही ४जीच्या रेंजमध्ये येण्याची शक्यता आहे. PVTG वसाहतींसह देशातील ग्रामीण, दुर्गम आणि डोंगराळ भागात मोबाईल टॉवर बसवून दूरसंचार कनेक्टिव्हिटीचा विस्तार करण्यासाठी सरकार डिजिटल इंडिया फंड अंतर्गत विविध योजना/प्रकल्प राबवत आहे. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत, 1,014 कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चासह PVTG वसाहतींना 4G कव्हरेज प्रदान करण्यासाठी विविध डिजिटल इंडिया फंड अनुदानित मोबाइल प्रकल्पांतर्गत 1,018 मोबाइल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत.












