The price of eggs increased : अंड्यांची किंमत वाढल्याने पोल्ट्रीला अच्छे दिन; निर्यातीलाही मागणी..

The price of eggs  increased :  हिवाळा आल्याने अंड्यांची मागणी वाढली आहे त्यामुळे राज्यासह देशात अंड्यांची किरकोळ किंमत थेट साडेसात ते आठ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे सध्या पोल्ट्री व्यावसायिकांचे अच्छे दिवस आले आहेत.

नाशिक, पुणे, मुंबईत पॅकींग केलेल्या सहा अंड्यांना सध्या ५४ ते ६० रुपये म्हणजेच प्रति नग ९ ते १० रुपये असा दर मिळत आहे. असे असले तरी कोबंडी खाद्याच्या किंमतीही वाढल्याने त्या कमी कराव्यात अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांनी केली आहे.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हिवाळयाच्या काळात मागणी वाढल्याने अंड्यांच्या किंमती वाढतात ही सामान्य बाब आहे. पण यंदा मात्र त्यात मोठीच वाढ झाली आहे. याचे कारण दोन देशांतून सुमारे ५ कोटी अंडी मागविण्यात आली आहे.

बांग्लादेश आणि मलेशिया या दोन देशांना डिसेंबर पर्यंत सुमारे ५ कोटी अंडी निर्यात करायची असून त्यामुळे स्थानिक अंडी बाजारावर ताण निर्माण झाला आहे. परिणामी देशांतील किंमती वाढल्या आहेत. बांगला देशात सध्या महागाई प्रचंड भडकली असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आयात केली जात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ओमान, मालदीव, युएई, कतार या देशांनाही अंड्यांची निर्यात होते.

सध्या सरासरी साडेसहा ते साडेसात रुपये अशा प्रतिनग अंड्यांच्या घाऊक किंमती आहेत. तर नाशिक, पुणे, मुंबई, नवी दिल्ली अशा शहरात याच किंमती किरकोळ बाजारात दहा रुपये प्रति नगापर्यंत पोहोचल्या आहेत.

Leave a Reply