Poultry farming: जम्मू-कश्मीरच्या कोंबड्या खाणार नाशिकचा मका

Poultry farming : जम्मू कश्मीरमधील पोल्ट्री उद्योगासाठी खाद्यान्न म्हणून नाशिकहून मका पाठविण्यात आला आहे. कांदा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्टेशनहून पहिल्यांदाच परराज्यात मक्याची पाठवण करण्यात आली आहे.

शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी लासलगाव येथून रेल्वे वॅगनमधून जम्मू कश्मीरसाठी सुमारे २६०० टन मका पाठवण्यात आला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा चांगल्या मोसमी पावसाने या लासलगाव व परिसरात मक्याचे उत्पादन चांगले झाले आहे. तसेच पोल्ट्रीसाठी मागणीही चांगली असल्याने मक्याला भविष्यात भाव येण्याची शक्यता आहे.

आगामी काळात नाशिकहून आणखी मक्याची मागणी असून तो जम्मू कश्मिरसह अन्य ठिकाणी पाठविण्यात येईल असे लासलागाव येथील मका निर्यातदारांनी सांगितले. दरम्यान हा मका पोल्ट्री खाद्य तयार करणाऱ्या कंपनीसाठी पाठविला जात असून त्यानंतर तो त्या राज्यातील पोल्ट्री उद्योगाला खाद्य म्हणून पुरवला जाईल.

Leave a Reply