Maka bajarbhav : बुधवार दिनांक १८ डिसेंबर रोजी इतर बाजारांच्या तुलने नाशिक जिल्ह्यातील बाजारात मक्याची सर्वाधिक म्हणजेस सुमारे १२ हजार क्विंटल आवक झाली. याठिकाणी कमीत कमी दर २ हजार तर सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
हायब्रीड मक्याची नाशिक जिल्ह्यात सुमारे ७ हजार क्विंटल आवक होऊन मक्याला सरासरी २२३५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. पिवळ्या मक्याची सुमारे सव्वा सहा हजार क्विंटल आवक होऊन सरासरी २१३६ रुपये दर मिळाला.
छत्रपती संभाजीनगर बाजारात पिवळ्या मक्याला सरासरी २११० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. जळगावमध्ये सरासरी २०३१ रुपये, जालन्यात २०७५, अमरावतीत १९४० रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव मिळाला.
दरम्यान मागील आठवड्यात म्हणजेच १५ डिसेंबरअखेर मक्याला सरासरी २०५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत रु.२०५० प्रती क्विंटल होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात देखील किंमत समान आहे.
खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत रु. २२२५ प्रती क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती MSP पेक्षा कमी आहेत. – मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे ४२.३६% व २५.२४% इतकी घट झाली आहे.
मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी अमळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक रु. २२२९/ क्विंटल होती, तर छ. संभाजीनगर बाजारात सर्वात कमी रु. २०४१ प्रति क्विंटल होती.