Sugar crushing season : या साखर कारखान्यांची शेतकऱ्यांना पहिली उचल ३ हजारावर…

Sugar crushing season

Sugar crushing season:  राज्यात ऊस गाळप आणि साखरेच्या हंगामाने वेग धरला असून अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी निघून गेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाच्या पहिल्या हप्त्याची आता प्रतीक्षा आहे. ऊस पट्टा असलेल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऊसाची पहिली उचल जाहीर केली आहे.

सांगलीतील बहुतेक साखर कारखान्यांनी पहिली उचल ३ हजारावर जाहीर केली असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता पेमेंटचे वेध लागले आहेत. हुतात्मा सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल ३२०४ रुपये जाहीर केली आहे. या कारखान्याचे चेअरमन वैभव नाईक आहेत.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने ३२०० रुपये पहिली उचल जाहीर केली आहे. या कारखान्याचे चेअरमन जयंत पाटील आहेत. दरम्यान यंदा या सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे अंतिम दर हे ३६०० रुपयांच्या आसपास जाण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

*रावळगाव कारखान्याची पहिली उचल*
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील चॉकलेट, गोळ्या व टॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या रावळगाव साखर कारखान्याने पहिली उचल जाहीर केली आहे. या कारखान्याची पहिली उचल सांगली जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. या गळीत हंगामात या कारखान्याने २७०० रुपये पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. बबनराव गायकवाड हे या कारख्याने एमडी आणि चेअरमन आहेत.03:15 PM

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *