Maharashtra Weather Update: राज्यात लाट ओसरली, पण थंडी कायम

More Colder

Maharashtra Weather Update : येत्या पाच दिवसा (१९ ते २४ डिसेंबर) मधील माफक थंडी व तापमाने गुरुवारपपासून पुढील पाच म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरून खालीलप्रमाणे भागपरत्वे तापमाने राहून माफक थंडीची शक्यता जाणवते. 

मुंबईसह कोकण – किमान १५ ते २० तर कमाल ३१ ते ३४ डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्य महाराष्ट्र -किमान तापमान हे ७ ते १४ तर कमाल तापमान २६ ते ३१ डिग्री से. ग्रेड,
मराठवाडा – किमान तापमान हे ९ ते ११ तर कमाल तापमान २९ ते ३० डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे ९ ते १३ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से. ग्रेड                  

त्यानंतरच्या पुढील पाच (२५ ते २९ डिसेंबर) तापमानात अजून वाढ होवून ऊबदारपणा जाणवेल. त्या दिवसातील तापमाने –
मुंबईसह कोकण – किमान १७ ते २० तर कमाल ३२ ते ३४ डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्यमहाराष्ट्र -किमान तापमान हे ९ ते १५ तर कमाल तापमान २८ ते ३२ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे १० ते १२ तर कमाल तापमान ३० ते ३२ डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे ११ ते १५ तर कमाल तापमान ३० ते ३३ डिग्री से. गेल्यामुळे दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी यावर्षी  जाणवणार नाही, असा अंदाज जेष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.              

पुन्हा वर्षअखेर व नववर्षातील ३० डिसेंबर पासून थंडीत वाढ होण्याची शक्यता असुन तापमाने खालीलप्रमाणे असतील.
मुंबईसह कोकण – किमान १२ ते १७ तर कमाल २६ ते ३० डिग्री से. ग्रेड,
खान्देश सह मध्य महाराष्ट्र -किमान तापमान हे ५ ते १२ तर कमाल तापमान २६ ते ३१ डिग्री से. ग्रेड
मराठवाडा – किमान तापमान हे ८ ते ११ तर कमाल तापमान २८ ते ३० डिग्री से. ग्रेड
विदर्भ -किमान तापमान हे ८ ते १२ तर कमाल तापमान २७ ते ३० डिग्री से.ग्रे.
वर्षाअखेरीस म्हणजे रविवार दि. २९ डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होवून नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *