Krishi salla : सध्या हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे.
ऊसावरील पांढरी माशी नियंत्रण*
१. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
२. ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३. ऊस पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. हळद पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
*हळदीवरील कीट नियंत्रण:*
१. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी. (हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत).
२. उघड्या पडलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामूळे, उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत व वेळेवर हळदीची भरणी करावी.
३. प्रति बंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच अंतराने प्रत्येक महीन्यात जमिनीतून क्लोरोपायरीफॉस 50% 50 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी.
४. हळदीच्या पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत.
*फळबागेचे व्यवस्थापन असे करा*
१. मृग बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत फळ वाढीसाठी 00:52:34 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा/मोसंबी बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
२. संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
३. काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी.
४. चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.