Kanda bajarbhav: रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी २१०० रुपये, तर जुन्नर बाजारात सरासरी २२०० रुपये प्रति क्विंटल कांदा बाजारभाव होते. मागच्या रविवारच्या तुलनेत या रविवारी राज्यातील कांदा आवकेत वाढ होऊन ती सुमारे ७६ हजार क्विंटल इतकी झाली. दरम्यान आठवडा संपताना लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी २ हजार रुपयांचा दर होता. गुरूवारपर्यंत कांदा दरात घसरण असली, तरी नंतरचे तीन दिवस कांदा दर काहीसा स्थिरावल्याचे पाहायला मिळाले.
आवक वाढली, दर घसरले
नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सुमारे ७६ हजार टन कांदा आवक झाली आणि लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी ४१०० रुपये प्रति क्विंटल असे होते. त्यानंतर चार आठवड्यात सद्य:स्थितीत राज्यातील कांदा आवक जवळपास तिप्पट म्हणजेच सुमारे २ लाख टन इतकी झाली असून बाजारभाव सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल इतके आहेत.
दिनांक १६ ते २२ डिसेंबर या कालावधीतील सप्ताहात राज्यात सर्व प्रकारच्या कांद्याची २ लाख २ हजार टन इतकी झाली. त्यात लाल कांद्याचे प्रमाण अर्थातच जास्त होते, तर पांढऱ्या कांद्याचे प्रमाण नगण्य होते. लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव हे १७०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल असे होते.
मागील आठवड्यात म्हणजेच सोमवार दिनांक ९ डिसेंबर ते रविवार दिनांक १५ डिसेंबर या काळात राज्यात एकूण कांदा आवक ही सुमारे १ लाख ८३ हजार टन इतकी झाली. तर लाल कांद्याचे बाजारभाव सरासरी २५०० रुपये ते ३४०० रुपये प्रति क्विंटल होते.
त्याआधीच्या म्हणजेच सुमारे दोन आठवड्यापूर्वी २ डिसेंबर ते ८ डिसेंबर या सप्ताहात एकूण कांदा आवक १ लाख ६५ हजार टन इतकी होती. तर लाल कांद्याला सरासरी बाजारभाव ३५०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटल असे होते.
त्याच्याही आधी तीन आठवड्यापूर्वी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिनांक २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २४ या काळात राज्याची एकूण कांदा आवक ७६ हजार टन इतकी होती. तर लाल कांद्याला सरासरी बाजारभाव ३९०० ते ४३०० रुपये प्रति क्विंटल असे होते.