Soybean Bajarbhav : खाद्यतेल बाजारातील घसरणीचा सोयाबीन बाजारभावावर परिणाम…

*Soybean Bajarbhav: सोयाबीनचे बाजारभाव अजूनही कमीच असून त्या या आठवड्‌यात जागतिक पातळीवर तेलाचे दर घसरल्याने देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव पडले आहेत. त्याचाही परिणाम सोयाबीन खरेदीवर झाल्याचे सांगितले जात आहे.

परदेशातील खाद्यतेलाच्या दरात मागील आठवड्यात घसरण झाली, त्यात सोयाबीन तेलाचाही समावेश होता. त्याचा देशातील सोयाबीन तेलावरही झाला आहे. परिणामी सोयाबीनचे बाजारातील भाव आणखी खाली आले असून देशपातळीवर सध्या सोयाबीनचे दर सरासरी ३८०० ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल असे दिसत आहेत.

रविवारी दिनांक २२ डिसेंबर रोजी अंजनगाव सुर्जी येथील बाजारात सर्वाधिक म्हणजे ११ हजार ६०० क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. कमीत कमी ३५०० रुपये तर सरासरी ३९०० रुपये बाजारभाव होते. आज सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी पालम बाजारात पिवळ्या सोयाबीची अवघी १४४ क्विंटल आवक होऊन सरासरी दर ४३०० रुपये होता.

दरम्यान मोहरीच्या तेलाच्या दरातील अल्प वाढ वगळता, देशात या आठवड्यात बहुतेक खाद्य तेलांच्या किंमती घसरल्या होत्या. सरकी आणि सोयाबीनचे भाव कमी राहिल्याने भुईमूग तेलाचेही भाव घसरले कारण त्यांना मागणी कमी होती. पामतेलाचे भाव तर सोयाबीनपेक्षाही दहा रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले. सरकी पेंडचा भाव वायदे बाजारामुळे पडल्याने तोही घसरला परिणामी सरकी तेल स्वस्त झाल्याने सोयाबीनची मागणी आणखी घटल्याचे जाणकारांनी सांगितले.

वायदेबाजार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मागील आठवड्यात कापूस सरकीचे बाजारभाव वायदेबाजारात सरासरी ८ हजारांवरून पावणे सात हजारापर्यंत पाडण्यात आले. परिणामी सरकी स्वस्त होऊन कापूस शेतकऱ्यांसोबतच सोयाबीन व इतर तेलबियांच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजारभावावर परिणाम झाला कारण मागणीत झालेली घट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *